लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बीडवरून औरंगाबादकडे जात असलेल्या एका कारमध्ये धारदार शस्त्र असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली. त्यांनी लगेचच सापळा लावून सदर गाडी चंदनझिऱ्याजवळ अडवून तपासणी केली असता त्यातून तलवार जप्त करण्यात आली.रविवारी सायंकाळी जीप (एम.एच. २० व्हीएन २१२५) बीड येथून औरंगाबादकडे जात होती. या गाडीमध्ये तलवारीसह अन्य शस्त्र वाहून नेले जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार संबंधीत गाडीचा पाठलाग केला. विशेष म्हणजे सदर कारचालकाला थांबण्याच्या सूचना केल्यानंतरही त्या गाडीने भरधाव पुढे जात पोलीसांकडे दुर्लक्ष केले. गंभीर बाब लक्षात घेत पोलीसांनी जालना - औरंगाबाद मार्गावर उजव्या बाजूने सायरन वाजवून बीड येथील गाडीला चंदनझिरा येथील त्रिमुर्ती चौकात अडविले. गाडीची झडती घेतली असता त्यात तलवार आढळून आली. यावेळी पंकज ऊर्फ शंकर कल्याण शेळके (रा. पांढरी, ता. आष्टी जि. बीड), संदिप श्ोषराव पाडुळे (रा. रसुलाबाद, ता. गेवराई) आणि गणेश भागीनाथ राऊत (रा. पिंपळगाव काटे, ता. गंगापूर) यांना ताब्यात घेतले. त्याकडून जीप आणि तलवार जप्त करण्यात आले. ही कारवाई शेख रज्जाक, कमलाकर अंभोरे, संतोष सावंत, गणेश वाघ, रामदास जाधव यांनी पार पाडली.
पाठलाग करून तलवार जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:35 AM