जालना : जालना लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत २१.३५ टक्के मतदान झाले आहे.
जालना लोकसभा मतदार संघातील २०६१ मतदान केंद्रांवर सोमवारी सकाळी ७ पासून मतदानास उत्साहात प्रारंभ झाला. सकाळी ९ वाजेपर्यंत ६.८८ टक्के मतदान झाले होते. तर सकाळी ११ वाजेपर्यंत २१.३५ टक्के मतदान झाले. त्यात जालना विधानसभा मतदार संघात २१.७३ टक्के, बदनापूर विधानसभा मतदार संघात १८.२ टक्के, भोकरदन विधानसभा मतदार संघात २३.८३ टक्के, सिल्लोड विधानसभा मतदार संघात २३.२२ टक्के, फुलंब्री विधानसभा मतदार संघात १९.१ टक्के तर पैठण विधानसभा मतदार संघात २२.२३ टक्के मतदान झाले आहे.
सर्वच मतदान केंद्रांवर सुरळीत मतदान सुरू असून, पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्वपक्षीय नेतेमंडळीही विविध मतदान केंद्रांना भेटी देवून आढावा घेत होते.