लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्याचा निळ्या रॉकेलचा कोटा अर्ध्यावर आला आहे. वर्षभरापूर्वी १४ लाख लिटर रॉकेल येत होते, ते आता केवळ सात लाख लिटर एवढेच मागवण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर यांनी दिली.निळे रॉकेल मिळावे म्हणून पूर्वी रांगा लागत असत, त्यातच याचा मोठा काळाबाजार होऊन हे रॉकेल अनेकजण ट्रक तसेच रिक्षामध्ये इंधन म्हणून पेट्रोलमध्ये मिश्रण करून वापरले जात होते. आता जिल्ह्यात एलपीजी गॅस धारकांची संख्या ही अडीच लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्यातच गेल्या दोन वर्षात उज्वला गॅस योनजेमुळेही निळ्या रॉकेलची मागणी कमी होऊन उज्ज्वला गॅस योजनेतून दोन वर्षात ५० हजार नागरिकांना गॅसची जोडणी देण्यात आल्याचे सांगण्यात आले.असे असले तरी, जे सात लाख लिटर निळे रॉकेल सध्या जिल्ह्यात येत आहे, ते घाऊक, अर्धघाऊक तसेच स्वस्त धान्य दुकानदार आणि किरकोळ रॉकेल विक्रेत्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात वितरीत केले जात आहे.या रॉकेलचे वितरण सुरळीत न करणाऱ्यांवर आता थेट परवाना निलंबन आणि रद्दची कारवाई करण्यात येणार आहे.
जालना शहरातील रॉकेल वितरणाचा कोटा आला अर्ध्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 1:24 AM