जालना : बदनापूर तालुक्यातील मौजे दाभाडी येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री छापा मारत चार जणांना अटक केली. यातील एक आरोपी फरार झाला आहे.
यात पोलिसांनी जुगार सहित्यासह रोख रक्कम असा ८७ हजार ९१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कौतिक बरकु भुंजग (५८, रा. किन्होळा ता. बदनापूर), दलसिंग धोडींबा चंदवडे (४३, रा. पिंपळगाव शेरमुलकी ता. भोकरदन), दादाराव बळवंत दानवे (५० रा. पिंपळगाव दानवे, ता. भोकरदन), सर्जेराव साळुबा पडोळ (६२ रा. डोंगरगाव ता. बदनापूर), फरार गजानन रामदास बकाल (रा. दाभाडी, ता. बदनापूर) असे आरोपीची नावे आहेत.
पोलिसांना माहिती मिळाली की, बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथे काही लोक ५२ पत्यावर पैसे लावून जुगार खेळत आहे. या माहितीवरुन पोलिसांनी येथे छापा मारला. यावेळी पाच इसम ५२ पत्यावर पैसे लावून झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळत होते. त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, दोन दुचाकी असा एकूण ८७,९१२ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. राजेंद्रसिंह गौर, सपोउपनि विश्वनाथ भिसे, कर्मचारी नाईक फुलसिंग गुसिंगे, समाधान तेलंग्रे, पोकॉ. विष्णु कोरडे, राहुल काकरवाल यांनी केली.