लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील डबलजीन परिसरातील किरायाच्या खोलीत सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर कदीम पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई सोमवारी सायंकाळी करण्यात आली असून, यावेळी जुगाराच्या नोंदीची कागदपत्रे, १२ मोबाईलसह तब्बल ६० लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.शहरातील डबल जीन भागातील एका इमारतीतील किरायाच्या खोलीत मटका अड्डा चालविला जात असल्याची माहिती कदीम पोलीस ठाण्याचे पोनि देविदास शेळके यांना मिळाली होती. या माहितीवरून शेळके व त्यांच्या टीमने सोमवारी सायंकाळी मटका अड्ड्यावर धाड मारली. यावेळी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून सहा महिन्याचे मटक्याचे रेकॉर्ड, १२ मोबाईल, प्रिंटर, कुलर, पंख्यासह इतर साहित्य असा ६० लाख २९ हजार ४०४ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मच्छिंद्र उत्तमराव आटोळे, ब्रह्मानंद अमरचंद काबणी, धीरज भरत भगत, अर्जुन बबनराव भावसार, भारत वसंत चंदन (सर्व रा. जालना), किशोर घनशाम राठोड (रा. औरंगाबाद) या सहा जणांसह तब्बल ४२ जणांविरूध्द कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि निशा बनसोड या करीत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि देविदास शेळके, सपोनि निशा बनसोड, पोना गणेश जाधव, रमेश काळे, अनिल जिने, दिगंबर चौरे, शेख रहीम, संजय अजगर आदींच्या पथकाने केली. पोलिसांनी कारवाई करून एक दोन नव्हे तब्बल ६० लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने मटका बहाद्दरांचे धाबे दणाणले आहे.
मटक्याची कन्ट्रोल रूम उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 1:01 AM