शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

वडीगोद्री, राजूर येथे पावसाने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 12:20 AM

वडीगोद्री आणि गोंदी मंडळात मंगळवारी अवकाळी पाऊस झाला.त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : वडीगोद्री आणि गोंदी मंडळात मंगळवारी अवकाळी पाऊस झाला.त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. याचा फटका फळबागांनाही बसला आहे. वडीगोद्री मंडळात या अवकाळी पावसामुळे प्राथमिक पाहणी अंदाजानुसार सुमारे २०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.त्यात वडीगोद्री मंडळात ८५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून गोंदी मंडळात जवळपास ११४ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे प्रशासनाकडून सांगणयत आले. दरम्यान या नुकसनीचे पंचनामे तातडीने करावेत अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.राजूरसह परिसरात मंगळवारी संध्याकाळी वादळी वा-यासह बिगरमौसमी गारांचा पाऊस झाल्याने रबी हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. राजूरसह परिसरातील तपोवन, तपोवन तांडा, चणेगांव, लोणगांव, थिगळखेडा, खामखेडा आदी भागात मंगळवारी संध्याकाळी वादळी वा-यासह गारांचा पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले.आमदार कुचे, तहसीलदारांकडून पाहणीबदनापूर : तालुक्यात झालेल्या गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतक-यांना धीर देण्यासाठी आमदार नारायण कुचे व तहसीलदार छाया पवार यांनी बुधवारी आन्वी, उज्जैपुरी, वाल्हा, भराडखेडा या गावातील शिवारातील शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी अनिल कोलते, भगवान बारगाजे, भगवान घाडगे,परमेश्वर शिंदे, संजय जगदाळे आदींसह मंडळ अधिकारी, तलाठ्यांची उपस्थिती होती. मंगळवारी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने रबी हंगामातील पिकांसह मोठ्या प्रमाणावर फळबागांचे नुकसान झाले. या पावसाने निकळक, राळा, केळीगव्हाण, आन्वी, वाल्हा, उज्जैनपुरी, भराडखेडा, तळणी, म्हसला, लोधेवाडी ,नांदखेडा,सोमठाणा अशा अनेक गावांमधे गारपीट झाली. पावसात गहू, हरभरा,मोसंबी, डाळींब अशी विविध पिके, फळबाग व भाजीपाल्यांचे प्रचंड नुकसान झाले.यामुळे शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या नुकसानीचे वास्तव आकडे समोर येण्यासाठी तहसीलदार छाया पवार यांनी पंचनामे करण्याच्या सूचना लवकरच दिल्या जातील असे सांगितले.मापेगाव येथे गारपीटसातोना : परतूर तालुक्यातील मापेगाव खु. येथे मंगळवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने परिसरातील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. मापेगाव खु. येथील शाकेर शेख यांच्या मोसंबी, गहू, टरबूज, ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसात गारपीट असल्याने उभी पिके आडवी झाली. याच भागात बापूराव काकडे, राम बिजुळे, दत्ता तरवटे, छगन तरवटे, महंमद नासेर यांचे मोठे नुकसान झाले.फळबागांचे नुकसानवरफळ : जिल्ह्यासह विदर्भात मंगळवारी काही भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसाने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वरफळ परिसरातील मोसंबी, आंबा, डाळिंब, द्राक्ष बागांचे नुकसान झाले तर, गहू, हरभरा, मका पिकांनाही याचा मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

टॅग्स :RainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीNatural Calamityनैसर्गिक आपत्ती