दीपक ढोले।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाच्या लहरीपणाचा गत काही वर्षांपासून जालना जिल्ह्यातील शेतकरी, सर्वसामान्यांना फटका बसत आहे. जिल्ह्यातील मागील आठ वर्षांचे पर्जन्यमान पाहता ‘कभी खुशी कभी गम’चे चित्र दिसते. चार वर्षे पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली होती. तर चार वर्षे पाऊस कमी झाल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. यंदाही पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. मात्र, जिल्ह्यातील ३० हून अधिक प्रकल्प जोत्याखाली आहेत.जिल्ह्यात दिवसेंदिवस झाडांचे प्रमाण कमी होत आहे. झाडांचे प्रमाण कमी होत असल्याने मागील काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याला सतत दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. दुष्काळामुळे पाणीपुरवठा करणारे सर्व धरणे कोरडेठाक पडत असून, सर्वसामान्यांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.गतवर्षी कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे कोरडीठाक पडली होती. त्यामुळे यावर्षी जोरदार पावसाची आशा सर्वांनाच होती. परंतु, जुनच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत होता. मात्र, आक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने जिल्ह्यातील सर्वच धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे सततच्या दुष्काळाला सामना करणाऱ्या जिल्ह्याला यावर्षी काहीसा दिलासा मिळाला आहे.दरम्यान, जिल्ह्यात मागील आठ वर्षांत चार वेळेस वार्षिक सरासरीच्या जास्त पाऊस झाला आहे. तर चार वेळेस वार्षिक सरासरीच्या कमी पाऊस झाला.३१ आक्टोंबरपर्यंत जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६८८.२१ मि.मी. आहे. २०१२ ला जिल्ह्याला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला. त्या वर्षी ३२४.९८ मि.मी. पाऊस पडला होता. २०१३ ला जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. त्यावर्षी ७८८.७५ मि.मी. पाऊस जिल्ह्यात पडला. त्यानंतर २०१४, २०१५ सलग दोन वर्षे पाऊस कमी पडल्याने दुष्काळाचा सामना करावा लागला. २०१६ आणि २०१७ ला पुन्हा चांगला पाऊस झाला. २०१६ ला ७८३ तर २०१७ ला ६७९ मि.मी. पावसाची नोंद झाली. २०१८ ला पुन्हा तीव्र दुष्काळासामोरे जावे लागले होते. त्यावर्षी ४२४ मि.मी.च पाऊस झाला. त्यामुळे सर्वाधिक टँकरने जिल्ह्यातील गावा-गावांना पाणी पुरवठा करावा लागला. यंदाही पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. मात्र, सर्वत्र समसमान पाऊस न झाल्याने ३० हून अधिक प्रकल्पात मृत पाणीसाठा आहेत. तर काही प्रकल्पात अपु-या प्रमाणात पाणीसाठा आहे.भोकरदनमध्ये एक हजार मि.मी. पाऊसमागील आठ वर्षांचा विचार केला तर भोकरदन तालुक्यात २०१३ ला ७८५ मिमी पाऊस पडला होता. त्यानंतर मात्र पावसाची सरासरी ६५० मिमीच्या आसपास राहिली.यात २०१२ मध्ये २९२ मि.मी, २०१३ ला ७८५, २०१४ ला ४६७.३८, २०१५ ला ४९३.५०, २०१६ ला ६७४, २०१७ ला ६५०, २०१८ ला ३६६ तर २०१९ ला १००१.८७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात यावर्षी ३१ आक्टोंबरपर्यंत १००१ मिमी पाऊस पडला आहे.
पावसाने आठ वर्षांत चार वेळेस ओलांडली सरासरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 12:34 AM