दीपक ढोले।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सततची दुष्काळी परिस्थिती, पाण्यासाठी होणारी भटकंती, पाण्यासाठी अनेकांनी गमवलेले जीव या सर्व बाबी डोळ््यासमोर ठेवून जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या संकल्पनेतून यावर्षी जिल्ह्यात रेन वॉटर हार्वेस्ंिटग उपक्रम राबविण्यात आला. यात शासकीय व वैयक्तिक अशा ३९२ जणांनी सहभाग घेतला. या उपक्रमामुळे जवळपास ३.२२ करोड लिटर पाण्याची बचत झाली असून, यातून १२ हजार लिटर क्षमतेचे २ हजार ६८१ टँकर भरू शकतात. दुष्काळ मुक्तीसाठी केलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतूक होत असून, राज्यातील इतर जिल्ह्यांनी या उपक्रमाचा आदर्श घेण्याची गरज आहे.झाडांच्या कमतरतेमुळे दरवर्षी मराठवाड्यात पर्जन्यमान कमी होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मराठवाड्याची वाटचाल वाळवंटी प्रदेशाकडे होत आहे. मागील काही वर्षांपासून भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याने पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. पाण्यासाठी अनेकांना आपला जीवही गमवावा लागला. गतवर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने प्रत्येक जिल्ह्यात जवळपास ६०० ते ७०० टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. जालना जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात टँकरने पाणीपुरवठा सुरू होता.जिल्हा टॅँकरमुक्त करण्यासाठी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात जिल्ह्यातील जास्तीत - जास्त लोकांनी सहभाग घ्यावा, यासाठी स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते. यामुळे जवळपास जिल्हाभरातील ३९२ जणांनी या स्पर्धेत भाग घेतला.त्यातच यावर्षी जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने याचा फायदा रेन वॉटर हार्वेस्टिंग या उपक्रमाला झाला. ज्या बोअर, विहिरी कोरड्याठाक पडल्या होत्या. त्या बोअर व विहिरींच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. तर काही ठिकाणच्या बोअरमधून पाणी बाहेर पडत आहे. या उपक्रमामुळे जवळपास ३.२२ कोटी लिटर पाणी जमिनीत मुरले असून, १२ हजार लिटर क्षमतेचे २ हजार ६८१ टॅकर या पाण्यातून भरू शकतात. त्यामुळे टँकरवर खर्च होणाऱ्या १.३४ करोड रूपयांची बचत होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.या उपक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुपमा नंदनवकर, पाणी गुणवत्ता तज्ज्ञ श्रीकांत चित्राल, नम्रता गोस्वामी, जय राठोड, भगवान तायड, संजय डोंगरदिवे, हिमांशू कुलकर्णी, ऋषिकेश जोशी यांनी परिश्रम घेतले.यावर्षी जिल्ह्यातील ३९२ जणांनी या प्रकल्पात सहभाग घेतला. याबाबत जनजागृती देखील करण्यात आली. पुढील वर्षीही जिल्हाभरात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी स्पर्धेचे आयोजनही करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी दिली. दरम्यान, पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी प्रत्येक गावाकरिता विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पाण्यासाठी ग्रामस्थांना पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाºया स्त्रोतावर अवलंबून राहावे लागते. भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यासाठी शासनातर्फे काही प्रमाणात उपाय -योजना करण्यात येतात. परंतु, जिल्ह्याची परिस्थिती पाहता त्या योजना अपुºया पडत होत्या. जुन महिन्याअखेर जिल्ह्यातील जवळपास ७० टक्के ग्रामीण भाग हा टँकरवर अवलंबून होता. ही बाब ओळखून मुख्य कार्यकारी अधिकारी अरोरा यांनी जिल्ह्यात रेन वॉटर हॉर्वेस्टिंग उपक्रम राबविण्याचे ठरवले.
रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे ३.२२ कोटी लिटर पाण्याची बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 12:37 AM