लोकमत न्यूज नेटवर्कअंकुशनगर : मराठवाड्यासह जालना जिल्ह्याची दुष्काळी परिस्थितीची दाहकता लक्षात घेता, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची आ. राजेश टोपे मुंबईत भेट घेऊन दुष्काळाची भयावह परिस्थिती लक्षात आणून दिली.जालना जिल्हयातील अंबड-घनसावंगी तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. नागरीकांसह जनावरांच्या पिण्याच्या प्रश्न गंभबर बनला आहे. परिसरात कोठेही पाणी उपलब्ध होत नसल्याने नागरीक हवालदिल झाले आहेत. तसेच लाभक्षेत्रातील शेतांमध्ये उभे असलेले ऊस पीक हातून जाण्याच्या मार्गावर असल्याचे टोपेंनी महाजन यांच्या निदर्शनात आणून दिले. अंबड व घनसावंगी तालुक्यातील गोदाकाठच्या सर्व गावातील ग्रापंचायतीने जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्या बाबतचे ठराव घेऊन एकत्रित प्रस्ताव तयार करुन जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेला आहे.आमदार राजेश टोपेंनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची मंत्रायलयातील त्यांच्या दालनामध्ये भेट घेतली. तात्काळ पाणी सोडण्याबाबत चर्चा करुन निवेदनासह प्रस्ताव सादर केलायावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जायकवाडीच्या कडा प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक बोलावून तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे टोपे म्हणाले.पाण्याचे गणितजायकवाडी धरणाचे एप्रिल अखेर पाणीसाठ्याचा विचार केला असता ३० एप्रिल अखेर धरणामध्ये ६६८.५९१ दलघमी. पाणीसाठा आहे.संभाव्य बाष्पीभवन तसेच औरंगाबाद महानगरपालीका, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व घरगुती पाणी वापर, जालना-अंबड व गेवराई शहरासाठी लागणारे पाणी अशा विविध कारणांसाठी राखून ठेवण्यात आलेले पाणी या सर्वांसाठी १६२.०० दलघमी. पाणी लागते.आजच्या पाणीपातळीपासून ४५३.५० मीटर पाणीपातळीपर्यंत १८०.९७६ दलघमी जिवंत पाणी उपलब्ध आहे.
राजेश टोपेंचे जलसंपदा मंत्री महाजनांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 1:18 AM