लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : नवे भोकरदन भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला शुक्रवारी सकाळी पुष्पहार अर्पण करून वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रदीप जोगदंडे यांच्या नेतृत्वाखाली शहरातून रॅली काढण्यात आली.शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, जाफराबाद रोड, पोलीस ठाणे चौक मार्गे रॅली काढण्यात आली. परत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ रॅलीची सांगता झाली. यावेळी प्रदीप जोगदंडे, शेख लाला भाई, अक्रम हाजी, इस्रार खान, नुजेर शाह, असिफ कुरेशी, विशाल मिसाळ, मंगलदीप पगारे, शेख नजीर, नसीम पठाण, अमजद पठाण, प्रवीण आढावा, शब्बीर कुरेशी, मुन्ना भाई, शेख सलीम, रमण पगारे, दीपक वेलदोडे, सुभाष सुरडकर, अमोल पगारे, रमेश पगारे, विकी पगारे यांच्यासह वंचित आघाडी, एमआयएमसह विविध पक्ष व संविधानवादी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.तीर्थपुरी बंदला प्रतिसादतीर्थपुरी : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पुकारण्यात आलेल्या बंदला तीर्थपुरी येथे प्रतिसाद मिळाला. येथील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदविला.घोषणांनी दणाणली टेंभुर्णीटेंभुर्णी : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या बंदला प्रतिसाद मिळाला. यानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीत आंदोलकांनी दिलेल्या घोषणांनी गाव दणाणून गेले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी संविधान बचाओ...देश बचाओ, सीएए, एनआरसी हटाओ...देश बचाओ, जो हिटलर की बात करेगा...हिटलकर की ही मौत मरेगा...इनक्लाब जिंदाबाद...., हिंदू, मुस्लिम, सीख, ईसाई...हम सब है भाई भाई आदी घोषणांनी संपूर्ण गाव दणाणून गेले. हातात भारताचा नकाशा, डॉ. बाबासाहेबांची प्रतिमा व तिरंगी ध्वज घेऊन चालणाºया विद्यार्थी, आंदोलकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक बोराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामधन कळंबे, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश गवळी, बसपाचे गौतम म्हस्के, गुड्डू मघाडे, शेख अहमद, शेख तालेब, असलम पठाण आदींची उपस्थिती होती.रांजणी बंदला प्रतिसादरांजणी : वंचित बहुजन आघाडीतर्फे शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या बंदला रांजणीकरांचा प्रतिसाद मिळाला. या बंदमुळे दर शुक्रवारी भरणारा आठवडी बाजारही भरला नाही. तर व्यापाऱ्यांनी सकाळी दुकाने उघडलीच नव्हती. यावेळी शफिक अतार, राहुल जाधव, रमण जाधव, कैलास जाधव, सिध्दार्थ सराटे, सखाराम जाधव, दीपक जाधव, दादाराव जाधव, मुखीद शेख, हारुण तांबोळी, अनिस शेख, इरफान तांबोळी, मोईन शेख, अजगर अली, मोईन बेग, सिकंदर शेख, रशीद शेख, सचिन पाटोळे, सुदाम पवार, आरेफ कुरेशी, युसूफ अली, मगदुम काजी, बाबर काजी, नजीब शेख, फारुक बागवान, असलम बागवान, इम्रान कुरेशी आदी सहभागी झाले. यावेळी पोनि शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि पी. पी. माने, जमादार जी. जी. मदन, भागवत खरात यांनी बंदोबस्त ठेवला होता.बदनापूर बंदला संमिश्र प्रतिसादबदनापूर : एनआरसी, सीएए, एनपीआर कायदा व केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणा विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या बदनापूर बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.वंचितच्या वतीने शहरातील विविध मार्गावरून मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी अशोक अंबिलढगे, रविराज वाहुळे, संतोष शेळके, प्रकाश मगरे, हरीश बोरूडे, नितीन साबळे, संदीप साबळे, राहुल खंडागळे, अजय साबळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते़ या बंदमुळे बाजारपेठेतील उलाढालीवर काहीसा परिणाम झाल्याचे सांगण्यात आले.आष्टी : आठवडी बाजारातील उलाढालीवर परिणामआष्टी : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी बंद पुकारण्यात आला होता. या बंदमुळे येथील आठवडी बाजारातील व्यवहारावरही मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. बंदमध्ये वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, एमआयएम इ. संघटनेच्या पदाधिकारी, सदस्यांनी सहभाग नोंदविला.आष्टी पोलिस ठाण्याचे सपोनि सुभाष सानप यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रोहन वाघमारे, प्रकाश मस्के, अच्युत पाईकराव, सत्तार कुरेशी, आसेफ जमीदार, मुजीब जमीदार, शेख जमीर, हनुमंत मोरे, राहुल कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थितहोते.
भोकरदन शहरात मोर्चा; बाजारपेठ ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 12:53 AM