जालना : ईद-ए-मिल्लादुन्नबीनिमित्त शहरातून शनिवारी रॅली काढण्यात आली. यामध्ये युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. रॅलीत घोडस्वारांसह रथामध्ये बसलेल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.मंगळबाजार परिसरातील गुलजार मशिद परिसरात जुलूस मोहम्मदिया काढण्यात आला. यामध्ये शेकडो नागरिक हातात झेंडे घेऊन सहभागी झाले. युवकांच्या हातातील हिरव्या झेड्यांसोबतच तिरंगा झेंडे आकर्षणाचे केंद्र ठरले.मंगळबाजार, कादराबाद चौक, सराफा बाजार, नेहरू रोड, फुलबाजार, मोती मशिद, सिंधीबाजार, अलंकार चौक, महावीर चौक या मार्गे काढण्यात आलेली रॅली दुपारी चार वाजता गरीब शहा बाजारात पोहचली. शहरातील विविध भागातून येणारे मुस्लिम बांधव यात सहभागी झाले. या रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. तसेच रॅलीत सहभागी समाजबांधवांसाठी पाणी व अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. शहरातील पेन्शनपुरा भागातून काढण्यात आलेल्या रॅलीत अनेकजण अरबी पोशाखात सहभागी झाले होते. या वेळी अब्दुल रशीद , सय्यद मुजाहेद हश्मी, मेराज पठाण, मुजाहेद अली, हाफीज यासिन, अब्दुल हमीद आदींनी रॅलीत सहभाग घेतला. या रॅलीसाठी मुन्नवर खान लाला, अल्ताफ कु रेशी, अकरम कुरेशी, जावेद कुरेशी, बाबा कुरेशी, रईस कुरेशी, शेख फरीद आदींनी पुढाकार घेतला.
जालन्यात ईद-ए-मिल्लादुन्नबीनिमित्त शहरात रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 12:12 AM