लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : झारखंडमध्ये तबरेज अन्सारी या युवकाचा मॉब लिंचिंगच्या रूपात काही गुंडांनी मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ व मॉब लिंचिंग करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी गुरूवारी सकाळी शहागड येथे आक्रोश रॅली काढण्यात आली होती.शहागड येथील जिल्हा परिषद हायस्कूल ते येडशी-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरून पैठण फाटा अशी तीन किलोमीटर पर्यंत आक्रोश रॅली काढण्यात आली. ‘तबरेज अन्सारी ला मारणा-या गुंडाना फाशी’ द्या अशी घोषणा यावेळी देण्यात आली. दरम्यान सीम तांबोळी, अर्शद चौधरी, सय्यद तारेख, एकबाल शेख, मुफ्ती अहेमद, बाहोद्दीन सौदागर, हनीफ इनामदार, राजू इनामदार यांनी मनोगत व्यक्त करीत शासन धोरणांवर सडकून टिका केली. मयत तबरेज अन्सारीला न्याय, नातेवाईकांना संरक्षण व त्याला मारणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. मुस्लिम समाजाकरिता अॅट्रासिटी कायदा पास करावा, मॉब लिंचिंग करणा-यांना फाशीची शिक्षा द्यावी, मुस्लिम समाज बांधवांना स्व रक्षणासाठी शस्त्र बाळगण्याचा कायदा बनवावा आदी विविध मागण्यांचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे, तलाठी अभिजीत देशमुख यांना देण्यात आले. यावेळी जमालोद्दीन तांबोळी, निसार बागवान, सिराज काझी, इमतियाज मनियार आदींची उपस्थिती होती.
‘त्या’ घटनेच्या निषेधार्थ रॅली...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 12:21 AM