शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

रामदेवबाबांच्या शिबिरात दानवे, खोतकरांचा योगा‘योग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:59 AM

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एकमेकांविरोधात शड्डू ठोकून असलेले भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे रविवारी पहाटे एकाच व्यासपीठावर दिसून आले. निमित्त होते ते योगगुरु बाबा रामदेव यांच्या योग प्रशिक्षण शिबिराचे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एकमेकांविरोधात शड्डू ठोकून असलेले भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे रविवारी पहाटे एकाच व्यासपीठावर दिसून आले. निमित्त होते ते योगगुरु बाबा रामदेव यांच्या योगप्रशिक्षण शिबिराचे. एरवी राजकीयदृष्ट्या एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी न सोडणारे कट्टर राजकीय विरोधक एकत्र आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. हा केवळ योगायोग की राजकीय चर्चेला पूर्णविराम देण्याची खा. दानवे यांची खेळी, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतआहे.जिल्ह्याच्या राजकारणात खा. दानवे आणि राज्यमंत्री खोतकर हे दोघेही ३०-३५ वर्षांपासून सक्रीय आहेत. शिवसेना आणि भाजप युतीच्या माध्यमातून दोघांनीही आपापले बालेकिल्ले मजबूत ठेवले. याकाळात युतीच्या सोयीचे राजकारण सहकार व इतर क्षेत्रांत केले गेले. राजकीय संघर्ष टाळून एकमेकांना सांभाळण्याचे प्रकार झाले. पण २०१४ मध्ये शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढले. यात भाजपला नेत्रदीपक यश जिल्ह्यातही मिळाले. अर्थातच एकेकाळचा मोठा भाऊ लहान झाला आणि लहान भाऊ मोठा झाला. त्यानंतर वर्षभरापूर्वी काही मुद्द््यांवरुन दोघांमध्ये राजकीय संघर्ष सुरु झाला. याला दोन्ही नेत्यांचे खंदे समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांनी खातपाणी घालण्याचे काम केले. त्यामुळे हा संघर्ष अधिकच तीव्र झाला. दोघांचे मनोमिलन घडवून आणण्यासाठी अनेकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न मात्र याला यश आले नाही.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभेसाठी सर्व मतदार संघांत उमेदवार देण्याचे जाहीर केले. त्यानंतर पक्ष देईल ती जबाबदारी आपण निभावू, असे राज्यमंत्री खोतकर यांनी सांगितले. म्हणूनच खा. दानवे आणि राज्यमंत्री खोतकर यांच्यातच आगामी लोकसभा निवडणुकीत प्रमुख लढत होण्याची शक्यता बळावली आहे.जिल्ह्यात झालेल्या जाहीर सभा असो वा कॉर्नर बैठका यात भाजप आणि खा. दानवे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करण्याची एकही संधी शिवसेना आणि राज्यमंत्री खोतकर सोडत नसल्याचे दिसून येते.तर खा. दानवे यांनीही खोतकर यांच्या राजकीय विधानांना तितक्याच कौशल्याने प्रत्युत्तर देत आपणही राजकारणातील पितामह असल्याचे दाखवून दिले. एकेकाळचे राजकारणातील मित्र आता प्रतिस्पर्धी बनल्याने दोघांच्या राजकीय भूमिकांकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागूनआहे.खा. रावसाहेब दानवे यांनी योगगुरु बाबा रामदेव यांचे शहरात तीन दिवसीय योग शिबीर आयोजित केले आहे.शनिवारी याचे उद्घाटन झाले. तर शिबिराचा रविवारी दुसरा दिवस होता. पहाटे पाच वाजता याचे उदघाटन पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले.विशेष म्हणजे राज्यमंत्री खोतकर यांनी सहकुटुंब शिबिरास हजेरी लावली. व्यासपीठावर खा. दानवे आणि राज्यमंत्री खोतकर हे एकत्र आल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.एरवी राजकारणात डावपेच आखून प्रतिस्पर्धीस नामोहरम करणारे हे दिग्गज नेते शिबिरात एकमेकांसमवेत योग करताना दिसून आले.योग हे शारीरिक आणि मानसिक बळ व उर्जा वाढविण्याचे प्रमुख साधन मानले जाते. येणाºया लोकसभा निवडणुकीत विजयश्री प्राप्त करण्यासाठी या शिबिरातून या दोन्ही नेत्यांनी ‘ऊर्जा’ मिळवली नसेल तरच नवल!योग शिबिराच्या निमित्ताने दोन्ही नेते एकत्र येण्याचा हा केवळ योगायोग की वर्षभरापासून सुरु असलेल्या राजकीय चर्चेला पूर्णविराम देण्याची खा. दानवेंची खेळी होती, अशी चर्चाही उपस्थितांमध्ये रंगली होती.लोकसभेसाठी रंजक स्थितीजालना लोकसभा मतदार संघासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे इच्छुक आहेत. पण ऐनवेळी शिवसेना आणि भाजपची युती झाली तर पारंपरिक फॉर्म्युल्यानुसार ही जागा भाजपकडे जाईल. तसे झाले तर राज्यमंत्री खोतकर यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.