जालना : योग आणि आयुर्वेदच्या प्रचार-प्रसारासाठी पतंजली योग पिठाचे रामदेवबाबा यांचे योग तीन दिवसीय नि:शुल्क योग शिबीर पुढील महिन्यात जालन्यात येथे होणार आहे. रविवारी येथील पतंजली योग समितीच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत शिबिराबाबत माहिती देण्यात आली.भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या पुढाकारातून जालन्यात प्रथमच रामदेव बाबा यांचे शिबिर होत आहे. फेबु्रवारी महिन्यातील २४, २५ आणि २६ तारखेला सकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेत होणा-या या शिबिराचे स्थळ लवकरच निश्चित केले जाणार आहे. शिबिराच्या नियोजनासाठी तीस समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच ५०० सेवार्थी काम पाहणार आहेत. यासाठी शहरासह व ग्रामीण भागात जनजागृती केली जाणार आहे. या शिबिरात एक लाखांहून अधिक साधक सहभागी होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. महिला व युवकांसाठी रामेदव महाराज यांच्या उपस्थितीत विशेष मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेस पतंजली योगपीठाचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी बापू पाडळकर, युवा भारतचे प्रांतप्रभारी श्रीराम लाखे, महिला पतंजली योग समितीच्या प्रांतप्रभारी डॉ. सुधा आळिमोरे, उदय वाणी, शिवाजीराव कवळे यांची उपस्थिती होती.--------------तयारीनिमित्त बैठकशिबिराच्या आयोजनांसदर्भात रविवारी येथील रुख्मिणी गार्डनमध्ये पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान न्यास, युवा भारत, पंतजली किसान समितीच्या सदस्यांची बैठक झाली. खा. दानवे यांनी समितीच्या सदस्यांची भेट घेऊन आयोजनाबाबत चर्चा केली.
जालन्यात रामदेवबाबांचे ऐतिहासिक योग शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 11:28 PM