जालना : योग आणि आयुर्वेदाच्या प्रचार-प्रसारासाठी पतंजली योग पिठाचे रामदेवबाबा यांचे २४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान योग शिबीर होत आहे. बीज शीतल सीडस् परिसरात या शिबिराची जय्यत तयारी सुरु असून, जिल्ह्यासह इतर भागांतील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी येथे केले.जालन्यात प्रथमच रामदेव बाबा यांचे योग शिबीर होत आहे. या शिबिराच्या तयारीचा खा. दानवे यांनी मंगळवारी भाजप कार्यालयात आढावा घेतला. शिबिरासाठी स्थापन केलेल्या विविध समित्यांच्या कामांची माहिती घेऊन त्यांनी तयारीबाबत समाधान व्यक्त केले. २४, २५ आणि २६ या काळात सकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेत होणा-या या शिबिराची जनजागृती जिल्ह्याच्या कानाकोप-यात घरोघरी फिरून केली जात आहे. शिबिराच्या नियोजनासाठी तीस समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच ५०० सेवार्थी काम पाहत आहेत. महिला व युवकांसाठी बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे. या शिबिरात एक लाखांहून अधिक साधक सहभागी होतील, असा विश्वास खा. दानवे यांनी व्यक्त केला.
रामदेवबाबांचे योग शिबीर ऐतिहासिक ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:53 AM