शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

Raosaheb Danve: ST संपातील कर्मचाऱ्यांना 1 महिन्याचा किराणा, भाजपकडून 'एक हात मदतीचा'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 1:16 PM

पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी गिरगाव न्यायालयात जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर ॲड. सदावर्तेंच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली

मुंबई - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर संपात सहभागी असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. याप्रकरणी 109 कर्मचाऱ्यांसह कामगारांचे वकिल अॅड. गुणरत्न सदावर्तेंना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे, अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असल्याचे दिसून येते. या संपातील कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रूजू होण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. दरम्यान, आज भाजपने संपातील कामगारांना 'एक हात मदतीचा' देऊ केला आहे. 

पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी गिरगाव न्यायालयात जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर ॲड. सदावर्तेंच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली. तर, कामगारांना अगोदरच न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. एसटीतील बहुतांशी कर्मचाऱ्यांचा अद्यापही संप सुरूच आहे. या संपातील कर्मचाऱ्यांना भाजपने एक हात मदतीचा दिला आहे. केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्याहस्ते या कर्मचाऱ्यांना 1 महिना पुरेल एवढ्या किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. 

'एक हात मदतीचा' माझ्या मतदारसंघातील भोकरदन, जाफ्रबाद व सिल्लोड डेपोतील संपावर असलेल्या एस टी कर्मचारी बंधु-भगिनींना एका महिन्याचे किराणा वाटप आज केले. आमदार संतोष दानवे यांच्या 'मदत नव्हे कर्तव्य' या संकल्पनेतून आयोजित कार्यक्रमास एस टी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशी माहिती रावसाहेब दानवेंनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली.  

काय म्हणाले परिवहनमंत्री अनिल परब

न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले होते. कोविड आणि संप दोन्ही संपले आहेत. आता एसटी सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी मंत्री अनिल परब यांनी सोमवारी मंत्रालयात अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर परब म्हणाले की, कोविडमुळे आधीच एसटीची चाके थांबली होती. त्यात कामगारांच्या संपामुळे राज्यभरात एसटी पूर्णपणे बंद झाली. मात्र, सर्वसामान्यांची एसटी लवकरच पूर्ववत होईल. संपकरी कामगार कामावर हजर झाल्यानंतर एसटी लोकांच्या सेवेला जाण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे  अनिल परब यांनी सांगितले. तसेच गेल्या दोन वर्षांमध्ये एसटीचे मार्ग विस्कळीत झाले असल्याने काही मार्गही ठरवावे लागणार आहेत, असे परब म्हणाले.  

 

टॅग्स :ST Strikeएसटी संपraosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाCourtन्यायालय