शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
3
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
4
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
5
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
6
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
7
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
8
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
9
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
10
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
11
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
12
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
13
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
14
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
15
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
17
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
18
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्याला मारली लाथ; विरोधकांच्या टीकेनंतर 'तो' कार्यकर्ता म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 12:41 PM

विरोधकांनी दानवे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तसेच नेटकऱ्यांनी देखील दानवे यांच्या वागण्यावर भाष्य करत ट्रोलिंग केली.

जालना: आपल्या गावठी शैलीत मिश्किल टोलेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री भाजप नेते रावसाहेब दानवे एका नव्या वादात अडकले आहेत. दानवे आपल्या कार्यकर्त्याला लाथ मारत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. आता ज्याच्यासोबत हा प्रकार झाला तो कार्यकर्ता समोर आला असून त्याने नेमके काय घडले हे सांगत निवडणुकीच्या काळात विरोधकांना असेच निमित्त लागते, असे म्हटले आहे.

जालना लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून शिंदेसेनेचे अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात वितुष्ट आले होते. विधानसभा निवडणुकीत खोतकर जालनामधून महायुतीचे उमेदवार आहेत. मात्र, दानवे अद्याप त्यांच्या प्रचारात दिराकले नव्हते. यामुळे सोमवारी सकाळीच खोतकर बंधू भोकरदन येथे दानवे यांच्या निवासस्थानी गेले. येथे बंद दाराआड दानवे- खोतकर यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकांसोबत संवाद साधताना आता झाले गेले विसरून, आम्ही पुढे जाऊ, असे सांगत दिलजमाईवर शिक्कामोर्तब केले. यावेळी खोतकर यांनी दानवे यांना पुष्पगुच्छ दिला. मात्र, फोटो काढत असताना दानवे यांनी आपल्या बाजूला असलेल्या एका कार्यकर्त्यास लाथ मारून दूर लोटले. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामुळे विरोधकांनी दानवे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तसेच नेटकऱ्यांनी देखील दानवे यांच्या वागण्यावर भाष्य करत ट्रोलिंग केली. यानंतर आता तो कार्यकर्ता समोर आला आहे.

काय म्हणाला तो कार्यकर्तारावसाहेब दानवे यांनी लाथ मारलेल्या त्या कार्यकर्त्याचे नाव शेख हमद असे आहे. ते म्हणाले की,  माझा आणि रावसाहेब दानवे यांचा ३० वर्षांचा दोस्ताना आहे. दानवे यांचे शर्ट अडकल्याने त्यांच्या कानात मी सांगितले. मात्र, त्यांना ते समजले नाही, तसेच त्यावेळी त्यांच्या हातात पुष्पगुच्छ असल्याने दानवे यांनी मिश्किलपणे आपल्याला बाजूला सारले. निवडणुकीच्या काळात विरोधकांना असेच निमित्त लागते, असेही शेख हमद यांनी म्हटले आहे.

शरद पवार, संजय राऊत, सुषमा अंधारे यांची टीकायावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील टीका केली आहे. त्या पक्षामध्ये सहकाऱ्यांना कसे वागवले जाते याचे लक्षण असल्याचे पवार म्हणाले. तसेच संजय राऊत यांनी देखील दानवे यांच्यावर कितीवेळा बोलायचे असा सवाल केला. यावर देवेंद्र फडणवीस यांना विचारा, तुमच्या पक्षात कार्यकऱ्यांना असे वागवले जाते का, अशा शब्दांत समाचार घेतला. तसेच रावसाहेब दानवे यांचा व्हिडीओ ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एका सभेत दाखवला. सुषमा अंधारे म्हणाल्या की, अशा पद्धतीने हे जर लोकांना लाथा घालत असतील तर जनता यांना लाथाडल्याशिवाय राहणार नाही. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देण्याची चळवळ म्हणजे बाबासाहेबांची चळवळ आहे. महापुरुषांनी आम्हाला मानवतेचा वसा दिलाय. असे व्हिडीओ पाहिल्यानंतर वाटतं की, भाजपने तयार केलेले हे लोक अशा पद्धतीने वागवतात. २० तारखेला मतदानाला जाताना हा व्हिडीओ लक्षात ठेवा, असे त्यांनी म्हटले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकbhokardan-acभोकरदनJalanaजालनाraosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपा