लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत जालना लोकसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकाºयांची बैठक पार पडली. यावेळी बुथ पातळीवर कार्यकर्त्यांनी कशी तयारी करावी या संदर्भात मार्गदर्शन करण्यात येऊन, उपस्थित पदाधिकाºयांचे म्हणणे जाणून घेतले.येथील बीज शितल सिडस्च्या जालना-औरंगाबाद मार्गावरील सभागृहात ही बैठक पार पडली. दुपारी तब्बल तीन तास बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. अचानक बोलावलेल्या या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्ते किती तत्पर आहेत, याची चाचपणी करण्यात आली. या बैठकीतस पैठण, फुलंब्री, सिल्लाडेसह जालना जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी हजर होते. यावेळी भाजपने या बैठकीविषयी कमलीची गुप्तता पाळली होती.बैठकीत खा. रावसाहेब दानवे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आपल्या समोर विरोधक कोणीही असो, त्याची चिंता आपल्या कार्यकर्त्यांनी करण्याची गरज नाही. निवडणुका या संघटनात्मक बांधणीतून जिंकता येतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकूणच भाजपकडून यापूर्वीही अशाच प्रकारची बैठक राजूर येथे घेतली होती. दरम्यान जालना लोकसभा निवडणुकीचा विचार करता येथे विद्यमान खा. रावसाहेब दानवे हे सलग चारवेळेस येथून विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांची ही पाचवी टर्म असणार आहे.ते स्वत: प्रदेशाध्यक्ष असल्याने ते स्वत:च्या मतदार संघाची आधीच मोर्चेबांधणी पक्की करून घेत आहेत. कारण नंतर त्यांना निवडणुका लागल्यावर संपूर्ण राज्याचा प्रचार दौरा करावा लागणार असल्याने ते या मतदार संघात वेळ देऊ शकणार नसल्याने ही तयारी असल्याचे बोलले जात आहे.विरोधकां बाबत संभ्रम कायमजालना लोकसभा मतदार संघात काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळते हे अद्याप स्पष्ट झाले नाही. असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. सतीश चव्हाण यांनी नुककताच झंझावती दौरा करून जालन्यातील प्रमुख संस्थांमध्ये सभा घेऊन पेरणी सुरू केली आहे. तर श्विसेना, भाजप युती बाबत अद्याप निर्णय न झाल्याने लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी सज्ज असलेले राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी देखील त्यांचे राजकीय पत्ते अद्याप न उघडल्याने संभ्रम कायम असल्याचे दिसून येत आहे. जालना लोकसभा मतदार संघ हा काँग्रेससाठी सुटलेला आहे.
रावसाहेब दानवे यांच्याकडून लोकसभेसाठी मोर्चेबांधणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:15 AM
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत जालना लोकसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकाºयांची बैठक पार पडली.
ठळक मुद्देजालन्यात बैठक : लोकसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती