बदनापूर : तालुक्यातील शेतकऱ्यांना २०१६ पासूनचा खरीप पीकविमा मिळालेला नाही. लाभार्थी शेतकऱ्यांना तात्काळ खरीप हंगामाचा पीकविमा द्यावा, या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने शुक्रवारी जालना- औरंगाबाद महामार्गावरील बालाजी कॉम्प्लेक्स समोर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.संघटनेचे शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पंकज जºहाड म्हणाले, येत्या ८ दिवसामध्ये शेतकºयांच्या बँक खात्यावर पीकविमा रक्कम जमा नाही झाली तर बदनापूर तालुक्यातील शेतकºयांसमवेत मुंबई-पुणे येथील विमा कंपन्याचे कार्यालयावर आंदोलन केले जाणार असून, यावेळी कोणताही अनूचित प्रकार घडला तर संबंधितांची ती जबाबदारी राहिल, असेही ते म्हणाले. यावेळी नायब तहसिलदारांनी आठ दिवसात संबंधित शेतकºयांच्या पीकविम्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष गंगाधर औताडे, प्रदेश युवा संघटक अशोक डवले, जिल्हाध्यक्ष हरी राऊत, ग्रामीण जिल्हाध्यक्ष गजानन सुरुशे, वि.आ. जिल्हाध्यक्ष किरण चौधरी, राहुल डोरकुले, राम मडके, वंजारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष समाधान दराडोह शेतकरी उपस्थित होते.
छावा क्रांतीवीर सेनेचे रास्तारोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:41 AM