मागील वर्षी उसाच्या अडचणीमुळे साखर कारखाने लवकरच बंद होण्याबरोबरच रसवंत्यांनाही उसासाठी अडचण आली आली होती. पाच हजार रुपये भाव देऊनही ऊस मिळेनासा झाला होता. यावर्षी मात्र सर्वत्र उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. साखर कारखाने सर्व ऊस नेतील का नाही? याबाबत ऊस उत्पादक सांशक आहेत. कारण कारखान्यांची क्षमता कमी व उसाचे क्षेत्र अधिक परिस्थिती यावर्षी झाली आहे. वाढत्या उसाच्या क्षेत्राचा फायदा मात्र रसवंती चालकांना होत आहे. मागील वर्षी पाच हजार रुपये भाव देऊनही उसासाठी भटकंती करावी लागायची. परंतु, यावर्षी रसवंतीसाठी सहज ऊस उपलब्ध होत आहे. याबरोबरच भावही कमी होऊन चार हजारांवर आले आहेत.
कोट
संक्रांत सणानंतर उसाच्या रसाला मागणी वाढते. यंदा उसाला कमी दर आहे. गतवर्षी ऊस महाग व लांबून आणावा लागत होता. यंदा मात्र, कमी दराने उसाची उपलब्धता होत असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे.
दत्ता काळे
रसवंती चालक, परतूर
(फोटो)