शहरं
Join us  
Trending Stories
1
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
2
हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार; अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
4
इराणमध्ये मोसादची भीती! अयातुल्ला खामेनेईंचा आता कोणावरही विश्वास नाही, स्वतःच्या सैन्याची सुरू केली चौकशी 
5
गरब्याची रंगत वाढणार! मुंबईत नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस लाऊडस्पीकरला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी
6
सोन्याची किंमत होती 99 रुपये तोळा, 77000 रुपयांपर्यंत कशी पोहोचली?
7
लक्ष्यभेद करणारा डोळा अन् चक्रव्यूह! 'बिग बॉस मराठी'ची चमचमती ट्रॉफी, टॉप ६ सदस्य पाहतच राहिले
8
इस्राइलविरोधात मुस्लिम समुदाय आक्रमक, देशातील अनेक भागात निदर्शने, नसरल्लाहचा शहीद म्हणून केला उल्लेख 
9
"'ते' एक वाक्य अन् तुम्ही माझ्या करिअरचं वाटोळं केलं"; पंकजा मुंडेंनी हसत हसत हातच जोडले
10
आजोबांनी नातीसाठी फुगा आणला पण तोच जीवावर बेतला; डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण
11
"इस्रायलला इशारा, अरब मुस्लिमांकडे मागितली साथ...; खामेनेईंच्या भाषणातील हे 10 मुद्दे आहेत खास
12
चार महिन्यांपासून पाकिस्तानच्या खेळाडूंचा पगार रखडला; आता PCB ने केली सारवासारव
13
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड
14
राजकीय पक्षांच्या मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या मेळाव्यात या: मनोज जरांगे
15
“चारवेळा CM असताना शरद पवारांना आरक्षणाचा मुद्दा का आठवला नाही”; शिंदे गटातील नेत्याचा सवाल
16
INDW vs NZW : सलामीच्या सामन्यापूर्वी Team India ला सरप्राईज; स्मृती मानधनाच्या डोळ्यात पाणी
17
काश्मिरात मोठा खेला? रिझल्टपूर्वीच NC-BJP सोबत येण्याची चर्चा; फारूक अब्दुल्ला कुणाला भेटले?
18
Ashish Shelar : "मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदार"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
19
“जरांगेंच्या प्रकृतीची काळजी, आमचे सरकार आल्यास ५० टक्क्यांवर आरक्षण देऊ”: संजय राऊत
20
"जोरात झटका लागला, व्हिडिओ काढले...", गोळी कशी लागली?; गोविंदाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम

राजकीय पक्षांच्या मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या मेळाव्यात या: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 3:32 PM

महायुती आणि महाविकास आघाडी मिळून आचारसंहिता लागण्यापूर्वी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्या : मनोज जरांगे

वडीगोद्री: दसरा मेळाव्याला तुफान गर्दी होणार आहे. हा मेळावा पारंपारिक होणार आहे, जातीचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. खूप दिवसांनी इच्छा पूर्ण झाली म्हणून संपूर्ण ताकदीने लोक येणार असून ५० ते ५५ हजार फक्त स्वयंसेवक आहेत. दुःखापासून समृद्धीकडे जाण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले आहे. सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला यायला पाहिजे कारण हा सामाजिक मेळावा आहे. राजकीय पक्षाच्या मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या मेळाव्याला या, असे आवाहन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी आज केले. त्यांनी अंतरवाली सराटीत प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

मनोज जरांगे पुढे म्हणाले, एका तासात मराठा आणि कुणबी एकच आहे असा शासन निर्णय होऊ शकतो. असं घडलं आहे या अगोदर. तिन्ही गॅजेट आज लागू होऊ शकतात. मर्यादा वाढायचं ठरलं तर एका दिवसात होऊ शकते. मला शंभर टक्के खात्री आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आमची मागणी मान्य केल्याशिवाय आचारसंहिता लावणार नाहीत. लोकसभेत मोदी महाराष्ट्रात होते तरी मराठ्यांनी दणका दिला. १३ महिन्यात तयारीच केली आहे ना, यांच्या एकदा याद्या होऊ द्या मग बघू. मराठ्यांना डावलून राज्यात सत्ता आणण सोपी गोष्ट नाही, असा थेट इशारा जरांगे यांनी सरकारला यावेळी दिला.

बोलबच्चन जमणार नाहीसत्ताधारी आणि विरोधकांना विनंती आहे की, ज्या गोष्टी होऊ शकत नाहीत त्या निवडणुकीच्या तोंडावर मांडून मराठ्यांना फसवू नका. तुमच्या दोघांच्या नाटकात मराठ्यांच्या पोरांचा बळी घेऊ नका. महायुती आणि महाविकास आघाडी मिळून आचारसंहिता लागण्यापूर्वी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्या आणि मग कोट्याची मर्यादा वाढवा. सगळ्या मराठ्यांना सांगतो हे सगळे नाटक आहे. आपण आपल्या ध्येयावर राहू. तुम्ही मर्यादा वाढवा पण ओबीसीतून मराठ्यांना ५० % आरक्षण द्या, असं करत असाल तर दोघांचेही कौतुक. पण बोलबच्चन करणार असाल तर नाही जमणार, असा सणसणीत टोला राजकीय पक्षांना जरांगे यांनी लगावला.

तुमच्यापेक्षा हुशार शेतकरी आहेनिवडणुकीत काय भूमिका असेल यावर बोलताना जरांगे म्हणाले की, यांना निवडून आणण्यासाठी आमच्या गरिबांनी मारामारी केल्या. दुसऱ्या दिवशी हे म्हटले आम्ही एक आहोत. तुम्ही मित्र आणि आम्ही शत्रू किती कमाल आहे. तुमच्यापेक्षा हुशार गुडघाभर चिखलात काम करणारा शेतकरी आहे. तुम्ही दगा फटका केलेला जनतेला मान्य नाही, अशी टीका जरांगे यांनी राजकीय पक्षांवर केली. मागील एक महिन्यापासून राजकीय भाषा माझ्या तोंडात नाही, आम्ही आमच्या संयमाने राहतो, मी त्यावेळेस सांगितलं होतं गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, गुलाल रुसवायची ताकद मराठ्यांमध्ये आहे, अशा शब्दात जरांगे यांनी राजकीय पक्षांना निर्वाणीचा इशारा दिला.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस