लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अंबड - वडीगोद्री रस्ता चौपदरीकरण तसेच अंबड शहराला बायपास करणे संदर्भात बुधवारी माजी आ. संतोष सांबरे यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना मुंबई येथ निवेदन दिले.या संदर्भात त्यांनी सविस्तर चर्चा केली संतोष सांबरे यांच्या कपात सुचने संदर्भात पाठविलेल्या पत्राच्या अनुषंगाने रस्ता चौपदरीकरण तसेच अंबड शहर बायपास संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव व अप्पर मुख्य सचिव मनोजकुमार सौनिक यांना याबाबतचा प्रस्ताव तपासून सादर करण्याचे निर्देश दिले.संतोष सांबरे यांनी सन २०१२ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भात उपस्थित केलेल्याकपात सूचनेबाबत चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या लेखी आश्वासनात तसेच बुधवारी चौपदरीकरण तसेच बायपास रस्ता होण्याची आवश्यकता, वाहतूक वर्दळ, अपघाताचे वाढते प्रमाण तसेच ड्रायपोर्ट व स्टिल उद्योगांमुळे जड वाहनांची वाढणारी वाहतूक या संदर्भात सविस्तर विवेचन झाल्यामुळे प्रस्ताव सादर करण्याबाबतचे आदेश पाटील यांनी दिले. या रस्त्याचे काम राष्ट्रीय मार्ग प्राधिकरण मार्फत सुरु असुन, रस्त्याची रुंदी फक्त १० मीटर आहे,ती वाढवून ३० मीटर करुन चौपदरीकरण करावे, तसेच अंबड शहराच्या वळण रस्त्यासाठी राज्य शासनाच्या अर्थसंकल्पातुन आर्थिक तरतूद करुन या रस्त्याचे प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी संतोष सांबरे यांनी यावेळी केली.शेगाव दिंडीच्या अपघातात १८ वारकरी मृत्यमुखी पडल्यानंतर विधानसभेच्या सभागृहात वादळी चर्चा होऊन रस्ता चौपदरीकरण होईल असे सभागृहात तत्कालीन मंत्री सार्वजनिक बांधकाम यांनी जाहीर केल्यानंतर बी.ओ.टी. तत्वावर सदर रस्ता चौपदरीकरण मंजूर झाला होता. परंतु, नंतरच्या काळात चौपदरीकरण रद्द करुन रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित करण्यात आला होता. यामुळे चौपदरीकरण आणि बायपास रस्ता मंजूर होण्याचा मार्ग सुकर झाल्याचे सांबरे यांनी सांगितले.
चौपदरीकरणासाठीचा प्रस्तावावर पुनर्विचार करण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 12:27 AM