कोव्हॅक्सिन लसीचे ४ हजार डोस प्राप्त झाले असून, जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालय, शहरी पाणीवेस, रामनगर, नूतन वसाहत प्राथमिक आरोग्य केंद्रांना वाटप करण्यात आले आहे. २२ जून २०२१ पासून जिल्ह्यातील सर्व कोविशिल्ड लसीकरण केंद्राच्या ठिकाणी १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना ५० टक्के ऑनलाईन व ५० टक्के स्पॉट नोंदणी करून लसीचा पहिला डोस देण्यात येत आहे.
गरोदर माता व स्तनदा माता यांचे लसीकरण जिल्ह्यात सुरू झाले आहे. त्यांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
लसीपासून वंचित असलेले १८ वर्ष व अधिक वयोगटातील सर्व नागरिकांनी लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन लसीकरण करून घेणे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. परदेशी जाणाऱ्या नागरिकांसाठी कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस देण्यासाठी नूतन वसाहत, जालना येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा डोस हा कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कमीत कमी २८ दिवसांचा कालावधी झाल्यानंतरच देण्यात येईल. हा डोस घेण्याकरिता परदेशात जाणाऱ्या नागरिकांनी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, जालना येथून प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून इतर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना लस दिली जाणार नाही. लस घेतल्यानंतर लाभार्थ्यांनी त्रिसूत्रीचा वापर करावा, मास्कचा नियमित वापर करावा, सॅनिटायझर नियमित वापरावे, हात नियमित धुण्यात यावेत, तसेच लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांनी लसीकरण केंद्रावर सामाजिक अंतराचे पालन करण्याबरोबरच गर्दी न करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.