शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

पावसाचा महाविक्रमी वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:44 AM

देव अर्थात भगवान असेलच तर त्याच्या घरी देर है..पर अंधेर नही.. अशी म्हण प्रचलित आहे. याचा प्रत्यय जालना जिल्ह्यात गुरूवारी जालनेकरांना आला. गुरूवारी सकाळ पासून सुरू झालेल्या पावसामुळे रेकॉर्ड ब्रेक वर्षाव केल्याने शेतकरी सुखावला आहे. जिल्ह्यातील एकूण ४९ महसूल मंडळात एकाचवेळी अतिवृष्टी होण्याची ही पहिलीच वेळ असावी.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : देव अर्थात भगवान असेलच तर त्याच्या घरी देर है..पर अंधेर नही.. अशी म्हण प्रचलित आहे. याचा प्रत्यय जालना जिल्ह्यात गुरूवारी जालनेकरांना आला. गुरूवारी सकाळ पासून सुरू झालेल्या पावसामुळे रेकॉर्ड ब्रेक वर्षाव केल्याने शेतकरी सुखावला आहे. जिल्ह्यातील एकूण ४९ महसूल मंडळात एकाचवेळी अतिवृष्टी होण्याची ही पहिलीच वेळ असावी.दीड महिन्याच्या खंडा नंतर गुरूवारी पावसाचे जिल्ह्यात दमदार पुनरागमन झाले. गुरूवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण पावसाची सरासरी ही २३६ मिलिमीटर एवढीच होती. तर ही पावसाची सरासरी शुक्रवारी सकाळी ८ वाजता चक्क ३४९ मिलिमीटरवर पोचली. त्यामुळे २४ तासात जालना जिल्ह्यात ११० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. या दमदार पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटला आहे. महसूल मंडळात पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा आहे.जालना १३२.६३, बदनापूर १४२.६०, भोकरदन ८८.८६, जाफराबाद ९३.८०, परतूर १३४.२०, मंठर ११६, अंबड ७७.२९ आणि घनसावंगी १२३.५७ असा एकूण ११३.६३ मिलिमीटर पाऊस गुरूवारी रात्री पडला. जो एक विक्रमी पाऊस म्हणून याची जिल्ह्यात नोंद झाली आहे. या पावसासुळे जिल्ह्यातील जवळपास सर्व नदी, नाले ओथंबून वाहिले. दीड महिन्याच्या खंडा नंतर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडल्याने मूग, तूर, कपाशी, मका आणि सोयाबीन पिकांना जीवनदान मिळाले आहे. मध्यंतरी कृषी विभागाच्या सर्व्हेक्षणानुसार जालना जिल्हा दुष्काळाच्या गडद छाायेत गेला होता.त्यामुळे येथील महसूल प्रशासनाने खरिप हंगामातील नुकसानीचे पंचनामे करावेत की, काय येथपर्यंत विषय पोहोचला होता. पावसाचा खंड आणि त्यातच कपाशीवर झालेला बोंडअळीचा हल्ला यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला होता. जालना जिल्ह्यातील ११३ गावांमध्ये बोंडअळीचा हल्ला झाल्याचा अहवाल कृषी विभागाने वरिष्ठांना दिला आहे. आता हा पाऊस पडल्याने कपाशीचे उत्पन्न घटले तरी, सोयाबीन आणि तुरीच्या माध्यमातून होणारे हे नुकसान भरून निघेल अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Rainपाऊसmonsoon 2018मान्सून 2018