जालना : जालना नगर पालिकेने मालमत्ता कराची वसुली मोहीम तीव्र केली आहे. गेल्या काही महिन्यात साडेचार कोटी रूपयांची वसुली केली आहे. शहरातील बड्या शंभर थकबाकीदारांना जप्तीच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. जालना पालिकेचे शहरातील मालमत्ता धारंकाकडे ४३ कोटी रूपयांची थकबाकी आहे.जालना पालिकेने मार्च महिना जवळ येण्यापूर्वी यंदा वसुलीला प्राधान्य दिले आहे. आता पर्यंत जवळपास २५ मालमत्ता जप्त केल्या असून, काहींना सील लावले आहे. जालना पालिकेच्या या वसुलीसाठी स्वतंत्र भरारी पथक स्थापन केले आहे. त्यामुळे आता हे पथक दररोज दहा हजार रूपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्यांकडे जाऊन कर भरण्याची विनंती करत आहे.त्यामुळे करवसुलीस प्रतिसाद मिळत असल्याचे आज तरी दिसून येत आहे. जालना शहरातील मालमत्ता कर वाढीच्या मुद्यावरून सध्या चांगलेच रान पेटले आहे. हा मुद्दा सर्वसाधारण सभेतही गाजला होता.यावरून आता पालिकेने वाढीव कर कमी करण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. परंतु या बाबत अद्याप निर्णय झाला नसून, केवळ या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली.मात्र पालिकेतीलच काही अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती देऊन करवाढीच्या मुद्यावरून दिशाभूल करत आहेत.वसुलीला प्राधान्यपालिकेला जे महत्वाचे उत्पन्नाचे मार्ग आहेत, त्या पैकी मालमत्ता कर हा अत्यंत महत्वाचा दुवा आहे. त्यामुळे या वसुलीला महत्व देऊन पालिकेचे उत्पन्न वाढविण्यावर आमचा भर आहे. नागरिकांकडेही कर भरण्यासाठीचा आर्थिक क्षमता आहे, मात्र केवळ चलता हे.. धोरण असा समज करून घेतल्याने वुसलीवर परिणाम झाला आहे. मात्र आता नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल तसेच मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी वसुलीस प्राधान्य दिले आहे. - केशव कानपुडे, कर अधीक्षक
मालमत्ता कराची ४३ पैकी साडेचार कोटी रुपयांची वसूली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 1:02 AM
जालना नगर पालिकेने मालमत्ता कराची वसुली मोहीम तीव्र केली आहे. गेल्या काही महिन्यात साडेचार कोटी रूपयांची वसुली केली आहे. शहरातील बड्या शंभर थकबाकीदारांना जप्तीच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
ठळक मुद्देजालना नगर पालिका : शंभर बड्या थकबाकीदारांना नोटीस