लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना पालिकेतील मालमत्ता कर वसुली विभागात कार्यरत असलेल्या लिपिकाला थेट मोतीबागेत सुरक्षारक्षकाचा पदभार सोपवल्याने पालिकेत सध्या चर्चेला उधाण आले आहे. ही नेमणूक अतिरिक्त मुख्याधिकारी कानपुडे यांनी केल्याचेही बोलेले जात आहे.सध्या जालना पालिकेत कर वसुलीच्या मुद्यावरून चांगलेच रान उठले आहे. जालना येथील औद्योगिक वसहातीतील कर वसुलीची जर ख-या अर्थाने चौकशी झाल्यास त्यातून मोठे गौडबंगाल हाती येऊ शकेल. ही मालमत्ता कराची वसुली हा देखील चर्चेचा विषय बनली आहे. त्यातच आता पालिकेने पुन्हा एकदा शहरात मालमत्ता कराची वसुली मोहीम तीव्र केली आहे. कानपुडे यांच्याकडे अतिरिक्त मुख्याधिकारी पदासह कर अधीक्षकाचाही पदभार आहे. दरम्यान हे पद ३१ डिसेंबर २०१८ च्या नगर परिषदेच्या प्रशासन संचालकांच्या निर्देशानुसार अतिरिक्त मुख्याधिकारी हे पद संपुष्टात आले असल्याचीही चर्चा आहे.जालना पालिकेचा मालमत्तार जवळपास ४२ कोटी रूपये हा शहरातील मालमत्ता धारकांकडे थकला आहे. तो वसुलीसाठी स्वतंत्र पथक नेमले आहे. या पथकाने आतापर्यंत जवळपास १५ पेक्षा मालमत्ताकर थकबाकीदारांना नोटीस देऊन त्यांची मालमत्ता सील केली आहे. मात्र, सध्या पालिकेत सुरू असलेल्या या नवीन फंड्यामुळे मुख्याधिकारी आणि अतिरिक्त मुख्याधिकारी यांच्यात समन्वय नसल्याचे दिसून येत असून, मुख्याधिका-यांना अंधारात ठेवून कानपुडेंकडून काही निर्णय घेतले जात असल्याचेही कर्मचाºयांचे म्हणणे आहे. बदली करण्याचे अधिकार नसतानाही बदल्या होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वसुली कर्मचाऱ्याला बनवले सुरक्षारक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:25 AM