जालना जिल्ह्यात ३२ हजारांपेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून, सध्या सक्रिय रुग्ण हे सहा हजार आहेत. त्यात सर्वांत जास्त रुग्ण हे जालन्यातील शासकीयसह खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज अनेकजण केवळ रेमडेसिवीर हे इंजेक्शन मिळावे म्हणून सर्व तो प्रयत्न करत आहेत. परंतु त्याचा पुरवठा कंपन्यांकडून होत नसल्याने ओरड होत आहे.
चौकट
रेमडेसिवीरचा आग्रह सोडावा
कोरोना झाल्यावर सर्वांत महत्त्वाची असते ती तुमची प्रतिकारशक्ती. ही प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रेमडेसिवीरचा उपयोग होतो. परंतु हाच एक पर्याय आहे, असे नाही. अन्य टॅबलेटस्चाही उपचारा दरम्यान डोस दिला जातो. परंतु त्याचा फारसा गाजावाजा होत नाही. त्यामुळे आज रेमडेसिवीरचे उत्पादन कमी असल्याने त्याची मागणी वाढली आहे. परंतु हेच इंजेक्शन रामबाण उपाय नाही हेही नागरिकांनी लक्षात घ्यावे.
डॉ. हितेश रायठठ्ठा, कोरोना उपचारतज्ज्ञ , जालना