शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

विमा काढताय... सावधान..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:24 AM

जळगाव, नाशिक, धुळे यासह अन्य जिल्ह्यांमध्ये वाहनांचा विमा काढताना काही अस्तित्वात नसलेल्या विमा कंपन्यांकडून तो काढण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या चुकीच्या विमा काढणाºयांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्यासह, पोलीसांनी देखील यात लक्ष घालण्याची विनंती उपप्रादेशिक अधिकाºयांनी एका पत्राव्दारे सायबर सेलकडे केली आहे.

ठळक मुद्देसायबर सेलने लक्ष द्यावे : उपप्रादेशिक अधिकाऱ्यांची पोलिसांकडे पत्राव्दारे विनंती

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जळगाव, नाशिक, धुळे यासह अन्य जिल्ह्यांमध्ये वाहनांचा विमा काढताना काही अस्तित्वात नसलेल्या विमा कंपन्यांकडून तो काढण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या चुकीच्या विमा काढणाºयांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्यासह, पोलीसांनी देखील यात लक्ष घालण्याची विनंती उपप्रादेशिक अधिकाºयांनी एका पत्राव्दारे सायबर सेलकडे केली आहे.केंद्र सरकारने आता वाहनांचा विमा उतरवतांना पुढील पाच वर्षाची रक्कम भरणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे अनेकांना ही बाब किचकट वाटत आहे. त्यामुळे यातून काही चुकीच्या व्यक्तींकडून इंटरनेटवरून नामांकित विमा कंपन्याचे बनावट लोगो तयार करून ग्राहकांना फसविण्याचे प्रकार पुढे येत आहेत. आतापर्यंत या प्रकरणांमध्ये कोट्यवधी रूपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.या संदर्भात उपप्रादेशिक अधिकारी संजय मेहेत्रेवार आणि काळे यांनी जालना येथील सायबर सेलला या संदर्भात लेखी पत्र दिले आहे. अशा काही बनावट कंपन्या जालना जिल्ह्यात कार्यरत आहेत, काय हे त्यांनी तपासावे, अशी विनंती या पत्रात केली असल्याचे सांगण्यात आले. चुकीच्या पध्दतीने विमा काढण्यास कोणीच जबादार राहणार नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.जालना : दररोज हजारो वाहनांची होतेय नोंदणीजालना जिल्ह्यात दररोज दुचाकी आणि चारचाकी वाहनांची नोंदणी उपप्रादेशिक अधिकाºयांच्या कार्यालयात होत असते. हे करत असताना आता पुढील पाचवर्ष कालावधीचा विमा भरावा लागणार आहे. त्यामुळे आॅनलाईन विमा भरताना त्यात काहीजण चुकीचे निकष लावून ग्राहकांची फसणूक करत आहेत. त्यामुळे विमा भरूनही जर एखादी दुर्घटना झाल्यास विमा कंपनीकडून मिळणारी आर्थिक नुकसान भरपााई मिळण्यास अडचणी येत येऊ शकतात. त्यामुळे सतर्क राहूनच विमा काढावा असे आवाहन केले आहे.नागरिकांनी सतर्क राहहावेही गंभीर बाब लक्षात घेऊन वाहनधारकांनी त्यांच्या चारचाकी वाहन असो अथवा दुचाकी आॅनलाईन तसेच सायबर कॅफेमधून विमा काढण्याचे प्रयत्न न करता संबंधित विमा कंपनीच्या जिल्हा अथवा तालुका पातळीवरील अधिकृत कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाºयांशी संपर्क करूनच विमा काढावा असे आवाहनही उपप्रादेशिक अधिकारी महेत्रेवार यांनी केले आहे.

टॅग्स :JalanaजालनाSocialसामाजिक