शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

जालना शहरात रेनवॉटर हार्वेस्टिंग कायदा कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:52 AM

रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून पाणी पातळी वाढविण्यासाठी मदत होते. ही बाब लक्षात घेता यासाठी कायदा करण्यात आला आहे. मात्र नगरपालिका प्रशासनाचे या कायद्याकडे दुर्लक्ष असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

गजानन वानखडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पाणी टंचाईवर कायमस्वरुपी मात करता यावी यासाठी भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवी यासाठी शासनस्तरावरुन विविध उपक्रम राबविले जातात. रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून पाणी पातळी वाढविण्यासाठी मदत होते. ही बाब लक्षात घेता यासाठी कायदा करण्यात आला आहे. मात्र नगरपालिका प्रशासनाचे या कायद्याकडे दुर्लक्ष असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. याचा परिणाम पर्जन्यमानावर झाला आहे. सलग चार वर्षापासून जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. यामुळे पावसाचे पडलेले पाणी, जमिनीत जिरवून भूगर्भातील पाणीपातळी वाढविण्यासाठी शासनाने रेन वॉटर हार्वेस्टिंगसंदर्भात कायदा केला. याबाबत नागरिकामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याच्या सुचना नगरपालिका प्रशासनाला दिलेल्या आहेत. हार्वेस्टिंग केल्याशिवाय बांधकामास परवानगी देऊ नये अशा नगरविकास खात्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. मात्र, या चांगल्या उपक्रमाविषयी नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. वाहून जाणाऱ्या पाण्याच पुनर्भरण होत नसल्याने शहरातील जुन्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत.कूपनलिकांचे पाणी खोलवर गेल्याने नागरिकांच्या समस्येत आणखीनच भर पडली आहे. साडेतीन लाखापेक्षा जास्त शहराची लोकसंख्या आहे. नवीन जालन्याला पाणीपुरवठा करणारा निजामकालीन घाणेवाडी जलाशय कोरडाठाक पडला आहे. तर जायकवाडी धरणातून नवीन शहरासाठी येणारे पाणी सुध्दा पंधरा दिवसानंतर एकदा येते. पाण्याविना नागरिकांचे हाल होत आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसात शहरातील विविध भागात पाण्याची टंचाई निर्माण होते.ही विपरीत परिस्थिती बदलण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी एक पर्याय आहे रेन वॉटर हार्वेस्टिंगचा, रस्त्यांमध्ये पाणी तुंबू लागते. नाले भरून वाहू लागतात. त्यामुळे वाहतूक ठप्प होते. रस्त्यांमध्ये वाहणारे हे पाणी जर रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या मदतीने साठविले गेले तर पाण्याचे दुर्भिक्ष्य नक्कीच कमी होईल.जलनपुनर्भरणामुळे होणारे फायदेयोग्य प्रकारे जलसंधारण आणि नियोजन केल्यास, पाणीपुरवठ्यासाठी बाहेरील स्रोतांवर कमी प्रमाणात अवलंबून राहावे लागते.तसेच जमिनीखालील पाण्याची पातळी वाढते. जमिनीखालील पाण्याची पातळी वाढल्यामुळे, पाणी वर खेचण्यासाठी लागणा-या विजेच्या वापरात बचत होते. जमिनीमध्ये जिरविले गेलेले पाणी शेतीच्या कामी वापरले जाऊ शकते. विशेषत: कमी पाऊस झाल्यास, किंवा ज्या भागांमध्ये पाण्याची कमतरता आहे, अशा ठिकाणी ह्या साठविलेल्या पाण्याचा उपयोग होऊ शकतो. तसेच गुरांना, जनावरांना पाजण्यासाठी देखील हे पाणी वापरले जाऊ शकते. जसजशी लोकसंख्या वाढत आहे, तसतशी पाण्याची मागणी देखील वाढत आहे. म्हणूनच अनेक ठिकाणी रहिवासी भागांमध्ये पाण्याची गरज भागविण्याकरिता बोअरवेल्स खणल्या जात आहेत. परिणामी, जमिनीखालील पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. जर पावसाचे पाणी जमिनीखाली जिरवणे गरजेचे आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईJalana Muncipalityजालना नगरपरिषदRainपाऊस