शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

मळणीयंत्र सुरु असताना दुरुस्ती करणे ठरले जीवघेणे; चालकाचे शीर झाले धडा वेगळे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2022 11:59 AM

नशिबाचा खेळ, शेळ्या चोरीस गेल्यानंतर घेतले होते मळणीयंत्र 

- फकिरा देशमुखभोकरदन (जालना): तालुक्यातील लिंगेवाडी येथे मळणीयंत्रात अडकून चालकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. संदिप सुधाकर गाढे ( 35, बाभूळगाव) असे मृताचे नाव आहे. 

या बाबतची अधिक माहिती अशी की, सध्या खरीप हंगामातील सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. संदिप गाढेकडे मळणीयंत्र असल्याने त्यास शेतातील कामे मिळत. आज सकाळी 10 वाजेच्या दरम्यान गावालगत असलेल्या लिंगेवाडी येथील सदाशिव साबळे यांच्या शेतात संदीप गेला होता.  सोयाबीन काढण्यासाठी मळणी यंत्र सुरु असताना त्यात तांत्रिक अडचण आली. पान्हा घेऊन दुरुस्ती करत असताना तोल गेल्याने संदीप मळणी यंत्रात ओढला गेला. 

हे पाहताच काहीजणांनी मळणीयंत्र बंद केले. मात्र, तोपर्यंत संदीपचा मृत्यू झाला होता. संदीपचे शीर धडा वेगळे झाल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. दरम्यान, माहिती मिळताच सपोनि रत्नदीप जोगदंड यांनी घटनास्थळी पोलिस कर्मचारी पाठविले. संदिपचा मळणीयंत्रात अडकलेला मृतदेह काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. 

शेळ्या चोरीस गेल्यानंतर घेतले मळणीयंत्र संदिपने बाभूळगाव येथे शेळीपालन व्यवसाय सुरू केला होता. व्यवसाय चांगला सुरू असताना चोरट्यानी पूर्ण शेळ्या चोरून नेल्या. यामुळे संदीपने मळणीयंत्र घेतले होते. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक लहान मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :JalanaजालनाAccidentअपघातDeathमृत्यू