लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खड्ड््यात हरवलेल्या अग्रसेन चौक ते औरंगाबाद चौफुली रस्त्याची बांधकाम विभागाने पुन्हा डागडुजी सुरू केली आहे. मात्र, खड्डे थातूरमातूर कामामुळे सकाळी बुजविलेले खड्डे सायंकाळपर्यंत जैसे थे होत आहेत. वाहनधारकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.अग्रसेन चौक ते औरंगाबाद चौफुली या मुख्य रस्त्याची स्थिती अत्यंत खराब झाली असून, वाहनधारकांना खड्ड््यातून रस्ता शोधावा लागत आहे. महाकाय खड्ड्यांमुळे मोठी वाहने खिळखिळी होत आहेत. रामतीर्थ पुलाजवळ उतारावरच दोन्ही बाजूंनी खड्डे असल्याने अपघात घडत आहेत. या रस्त्यावरील दुचाकींच्या शोरूमसमोर रस्ता आहे की नाही, अशी स्थिती आहे. या रस्त्यावरील खड्ड््यांची डागडुजी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, पाण्यासारखे पातळ डांबर, मोठे दगड व खडीचा चुरा टाकून हे खड्डे बुजविले जात आहे. रस्त्याच्या मध्येच दोन ड्रम उभे करून खड्डे बुजवले जात असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. रविवारी दुपारी रामतीर्थ पुलावर तासभर वाहतूक कोंडी झाल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली. खड्डंयामध्ये खडीचा चुरा टाकण्याचा हा प्रकार म्हणजे पैशाचा अपव्यय असल्याचे जाणकार सांगत आहे. शहरातील नूतन वसाहत उड्डाणपूल ते अंबड चौफुली, बालाजी चौक ते नवीन मोंढा, राष्ट्रीय हिंंदी विद्यालय- कन्हैय्यानगर हे महत्त्वाच्या रस्त्यांवर शहरात येणाऱ्यांचे खड्ड््यांनीच स्वागत होत आहे.
दुरुस्तीचे नाटक; एकाच दिवसात खड्डे जैसे थे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 12:37 AM