टेंभुर्णी : जीएसटीबाबत व्यापाऱ्यांसाठी जाचक ठरत असलेले नियम व अटी रद्द करा या मागणीचे निवेदन टेंभुर्णी व्यापारी महासंघातर्फे जाफराबाद तहसीलदारांना शुक्रवारी देण्यात आले.
याबाबत दिलेल्या लेखी निवेदनात व्यापारी संघाने म्हटले आहे की, शासनाच्या जीएसटी धोरणाला व्यापारी वर्गाचा विरोध नाही. मात्र, त्याबाबत ज्या जाचक अटी लादल्या गेल्या आहेत, त्याला आमचा विरोध आहे. जीएसटीमध्ये कुठलीही सुनावणी न करता किंवा कुठलीही नोटीस न देता माल जप्त करणे, लर्निंग रजिस्ट्रेशन रद्द करणे, रिटर्न दाखल करण्यास मनाई करणे, विनाकारण गुन्हे दाखल करणे, अचानक नियम बदल करणे, आदी जाचक अटी रद्द कराव्यात याबाबत शुक्रवारी पुकारलेल्या देशव्यापी बंदला पाठिंबा असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी व्यापारी महासंघाचे जिल्हा सदस्य अलकेश सोमानी, टेंभुर्णी शहराध्यक्ष कल्पेश सोमानी, संजय बोडखे, रामेश्वर साळवे, साहेबराव मोरे, फारेस चाऊस, रामेश्वर पन्हाळ्कर, बाबूराव लहाने, शंकर धनवई, धीरज काबरा, सय्यद मोहियोद्धीन, रामप्रसाद बारगुड़े, शरद गायमुखे, शारेक सिद्दीकी, दीपक जमधडे, स्वप्निल वाघमारे, शंकर मुळे, आदींची उपस्थिती होती.