जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ९ जणांना मंगळवारी यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. तर मंगळवारी १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १३ हजार ४८९ वर गेली असून, आजवर ३६० जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १२ हजार ९४२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
बाधितांमध्ये जालना शहरातील ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मंठा तालुक्यातील उमरखेड येथील एकास कोरोनाची लागण झाली. बदनापूर शहरातील तीन तर भोकरदन तालुक्यातील राजूर येथील एकास कोरोनाची लागण झाली. तर बुलडाणा जिल्ह्यातील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात एकूण १९ हजार ६३७ जण संशयित असून, मंगळवारी २१३ जणांचे स्वॅब प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी २७८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. परतूर येथील अलगीकरण कक्षात दोघांना ठेवण्यात आले आहे.