जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एकाचा गुरुवारी मृत्यू झाला. गुरुवारीच २७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर ७ जणांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १३ हजार ४३४ वर गेली असून, आजवर ३५७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर आतापर्यंत १२ हजार ८९३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
बाधितांमध्ये जालना शहरातील ९ तर तालुक्यातील पाथरगाव १, पिंपळगाव १, उमरखेडा १, मानेगाव सारवाडी येथील एकास कोरोनाची बाधा झाली. मंठा शहरातील १ तर तालुक्यातील पांगरी येथील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव येथील एकास कोरोनाची लागण झाली. बदनापूर शहरातील ३ तर तालुक्यातील कंडारी १, सोमठाणा २, भराडखेडा येथील एकास कोरोनाची बाधा झाली. भोकरदन तालुक्यातील राजूर येथील १ तर बुलडाणा जिल्ह्यातील १, औरंगाबादेतील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दोघांना परतूर येथील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.