शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
2
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
3
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव; शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले?
4
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
5
हिमेश रेशमियाला पितृशोक, गायकाच्या वडिलांचं ८७व्या वर्षी निधन
6
US Fedral Reserve नं कमी केले व्याजदर, शेअर बाजारात दिसू शकते तेजी; आणखी काय परिणाम होणार
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
8
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
9
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
10
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
11
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
12
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
13
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
14
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
15
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
16
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
17
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
18
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
19
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
20
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई

आरक्षणाचा आक्रोश भयंकर, पण बांगलादेशमध्ये झालं ते महाराष्ट्रात होणार नाही: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2024 5:28 PM

मराठा समाजाने एक दिवस हातातले काम सोडून शांतता रॅलीमध्ये सहभागी व्हावे.

- पवन पवारवडीगोद्री ( जालना) : आरक्षणाचा विषय सरकारने समजून घेतला पाहिजे. हा विषय साधासुधा नाही, खूप भयानक वेदना आणि आक्रोश समाजात आहे. पण बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर जे झाले ते महाराष्ट्रात होणार नाही. महाराष्ट्र सर्व जाती धर्माचा आहे. त्यामुळे इथे सर्व शांतता राहणार. कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही. मात्र, फडणवीसांच राज्यात दंगली घडवण्याचं षडयंत्र आहे, असा आरोप मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज केला. सोलापूर दौऱ्यावर जाण्या अगोदर जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

यावेळी जरांगे म्हणाले, मुद्दाम आपल्याला उचकवण्याचे काम राज्यात सुरू आहे  ते पण एक सरकारचा भाग आहेत अशी टिका मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरे वर  केली.  मराठा समाजाला माजी विनंती आहे की आपल्या राज्यात कुठेही आंदोलन नाही त्यामुळे आंदोलन आपण करायचं नाही आपण संयम धरा असे आवाहन मराठा बांधवांना ही केले. हे सर्वजण स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी माझ्यावर तुटून पडलेत. हे त्यांचे षडयंत्र आहे. आपण त्याला विरोधातील अभियान म्हणू. मात्र, आपण संयम धरा. कोणाला अडवायची गरज नाही, कोणाविरोधात आंदोलन करायची गरज नाही, राज्यात कुठेही समाजाचे आंदोलन सुरू नाही. त्यामुळे कोणीही आंदोलन करू नका. ज्याला बराळायचा आहे त्याला बरळू द्या, असा टोला मनोज जरांगे यांनी राज ठाकरे यांना लगावला.

उद्यापासून सोलापूर येथून मराठा शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे. मराठा समाजाने एक दिवस हातातले काम सोडून शांतता रॅलीमध्ये सहभागी व्हावे. प्रत्येक जिल्ह्यातला समाज ताकतीने एकत्र झाला आहे. सगळ्यात पक्षाच्या मराठा आमदारांनी समजून सांगणं आवश्यक आहे की आमच्या हक्काचं ओबीसीमधून आरक्षण आम्हाला द्या. सतेत्त जाण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. आम्हाला नाव ठेवायचे नाहीत. तुम्ही राजकारणात गेलात म्हणून गोरगरिबांची लाट आली, सामान्यांची लाट आली सर्व जाती धर्माच्या लोकांना वाटत आहे की, ही एवढीच वेळ आहे सत्तेत जाण्याची राजकारण्यांना पायाखाली तुडवण्याची योग्य वेळ हीच आहे, असा इशारा जरांगे यांनी दिला. 

पश्चिम महाराष्ट्र नंतर विदर्भ आणि मुंबई, कोकणचा सुद्धा दौरा करणार आहे. विधानसभा निवडणूक लढण्यासाठी कागदपत्र काढून ठेवा. लढायचं म्हटलं तर आपण तयारी असली पाहिजे. नाही म्हटलं तर मनस्थिती तयार करून ठेवा. यावेळी ताकतीने कार्यक्रम होणार आहे. १४ ते २० ऑगस्ट दरम्यान २८८ विधानसभेचा आढावा घेणार. २८८ मधील एससी एसटीच्या सुटलेल्या जागा आहेत त्याचाही विचार करणार. इतर छोट्या छोट्या जातीचे आमदार होण्याची सुद्धा या काळात दाट शक्यता आहे, खूप जागांवर विजय मिळू शकतो असे जरांगे म्हणाले. मराठ्यांना मुसलमानांना धनगरांना हे छेडायला लागले आहेत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र खवळून उठला आहे. गोरगरिबांचा सुवर्णकाळ आला आहे. १२ वर्षातून जसा कुंभमेळा येतो तसा हा सुवर्ण काळ आलेला आहे. सामान्यांची लाट आहे. आपला अपक्षच बर आहे यांना सर्व लोक कदरलेले आहेत, आघाड्या नकोच, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

फडणवीस यांनी सगळे चोर, डाके टाकणारे गोळा केले आहेत. कोणतं मिशन राबवतात छत्रपती शिवरायांचा अरबी समुद्रातला पुतळा झाला का? दहा टक्के ईसीबीसी दिलं नसतं तर ईडयूएस गेलं नसत. ७ ते १३ दरम्यान रॅली निघणार आहे. या रॅलीत सहभागी होऊ नये असा कोणता नेता म्हंटल्यावर त्याचा हिशोब होणार. फडणवीस साहेब जे करत आहे ते चुकीचे करत आहेत. माझ्या विरोधात बोलायला लावलं जात आहे. मराठ्यांच्या आमदारांचा नाईलाज झाला आहे, त्यांना बोलायला भाग पाडला आहे. मराठीच मराठ्यांच्या अंगावर घालायला लावत आहेत. येवले वाला शांत बसला आहे याचा अर्थ फडणवीस यांनी शांत राहण्याचे सांगितलं आहे.पण फडणवीस मराठ्यांच्या विरोधात अभियान करून फसणार आहेत, असेही जरांगे म्हणाले. 

अनेक माजी आमदार संपर्कात पश्चिम महाराष्ट्रातला एक आमदार मला भेटला होता. २० वर्ष पक्षाचे काम करून न्याय मिळत नसल्याचे त्यांना म्हटलं होतं.माझ्याजवळ एका गाडीत सात सात उमेदवार आहेत. काही माजी आमदार माझ्या संपर्कात आहेत. यांना कंटाळलेले लोक मला साथ देणार आहेत. कट्टर विरोधक सत्तेसाठी एकत्र आलेत, त्यामुळे जनता प्रचंड नाराज. आमच्यासोबत सगळ्या जातीचे लोक एकत्र येणार आहेत. २६ ऑगस्टला  लढायचा निर्णय झाला तर कागदपत्र काढून ठेवा, असे आवाहन देखील जरांगे यांनी केले आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलJalanaजालना