लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील ज्या प्रकल्पामध्ये पाणीसाठा उपलब्ध आहे, अशा ठिकाणचा पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्याचे निर्देश राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलाशयातील पाणीसाठा आरक्षित करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री लोणीकर बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, अपर जिल्हाधिकारी प्रकाश खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, जिल्ह्यात पाऊस नसल्याने प्रकल्पातील पाण्याची पातळी अत्यंत खोल गेली आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा वापर काळजीपूर्वक व जपून करणे गरजेचे असून, ज्या प्रकल्पामध्ये पाणीसाठा उपलब्ध आहे, अशा ठिकाणचा पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात यावा. त्याचबरोबरच जनावरांच्या चाºयाचाही प्रश्न निर्माण होणार आहे. लोअरदुधना सारख्या प्रकल्पात पाणी उपलब्ध असून, अशा ठिकाणी चारानिर्मितीसाठी पाणी उपलब्ध करुन देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. शेतकºयांना चारा निर्मितीसाठी बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. परजिल्ह्यातूनही चारा उपलब्ध करुन घेऊन त्यावर खर्च करण्यापेक्षा जिल्ह्यातच उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याच्या ठिकाणी चाºयाची निर्मिती केल्यास जनावरांच्या चाºयाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार असल्याचेही पालकमंत्री म्हणाले.शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यासाठी वॉटरग्रीड योजना साकारण्यात येत आहे. या योजनेचा डीपीआर बनवण्याचे काम इस्त्राईलच्या कंपनीला देण्यातआले आहे. या कंपनीने त्यांचा डीपीआर सादर केला असल्याचे लोणीकर म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची यावेळी उपस्थिती होती.
जालना जिल्ह्यातील प्रकल्पांचा पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:31 AM
जिल्ह्यातील ज्या प्रकल्पामध्ये पाणीसाठा उपलब्ध आहे, अशा ठिकाणचा पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्याचे निर्देश राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.
ठळक मुद्देबबनराव लोणीकर : उपलब्ध पाणी काळजीपूर्वक व जपुन वापरण्यासह वैरण लागवडीवर भर द्यावा