लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मुख्यमंत्र्यांना भेटण्यास जाणाऱ्या लोकप्रतिनिधी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना रस्त्यात अडवून त्यांच्यावर अमानुष लाठीहल्ला करणे हा प्रकारलोकशाहीला काळिमा फासणारा असून हुकूमशाहीला संवैधानिक मार्गाने प्रत्युत्तर देऊ असे उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी सांगितले.लाठीहल्ल्याचा जालना शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. जालना जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीने शेतकरी व सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. त्यातच महसूल यंत्रणेच्या चुकीच्या व निष्काळजीपणामुळे शेतक-यांचे अनुदान दुसºयाच्या खात्यावर जमा झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.पीकविमा, बोंडअळीचे अनुदान नसल्याने सणासुदीत दिवाळी सण साजरा कसा करावा या विवंचनेत सापडलेल्या शेतकºयांचे विविध प्रश्न घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी जात असताना त्यांना रस्त्यातच अडवून पोलीस यंत्रणेच्या वतीने बेछूटलाठीहल्ला करण्यात आला. या हल्ल्यामागील मुख्यसूत्रधाराचा शोध घेऊन या प्रकाराची चौकशी करावी आणि दोषींविरुध्द तात्काळ कार्यवाही करावी, नसता हुकूमशाहीच्या या प्रकारास संवैधानिक मार्गाने प्रत्युत्तर दिले जाईल असा इशारा राजेश राऊत यांनी दिला आहे.
हुकूमशाहीला संवैधानिक मार्गाने प्रत्युत्तर देऊ-राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2018 12:31 AM