लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आपल्या प्रभागातील अस्वच्छतेबाबतच्या तक्रारींसाठी स्वच्छता अॅप डाऊनलोड करण्यास जालनेकरांचा प्रतिसाद मिळत आहे. तीन दिवसात एक हजार नागरिकांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे.शहर अस्वच्छतेबाबत कायम ओरड करणा-या व चोवीस तास आॅनलाईन राहणाºया शहरवासियांकडून स्वच्छता अॅप डाऊनलोड करण्यास अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे वृत्त लोकमतने वृत्त आणि ‘झीरो ग्राउंड’ च्या माध्यमातून प्रकाशित केले होते. शहराचे जबाबदार नागरिक म्हणून शहर स्वच्छतेबाबत आपणही जागरुक राहणे आवश्यक असल्याची भूमिका लोकमतने आठवडाभरात सातत्याने मांडली. याचा सकारात्मक प्रभाव दिसून येत आहे. तीन दिवसांमध्ये शहरातील एक हजार व आतापर्यंत २१०० नागरिकांनी हे स्वच्छता अॅप डाऊनलोड केल्याची माहिती स्वच्छता विभागातून देण्यात आली. तसेच अॅपवर आतापर्यंत ८० तक्रारी प्राप्त झाल्या असून, पैकी २५ तक्रारी सोडविण्यात आल्याचे स्वच्छता विभाग प्रमुख माधव जामधडे यांनी सांगितले.स्मार्ट फोनचा वापर करणा-या प्रत्येकाने हे अॅप डाऊनलोड करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन नगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
‘स्वच्छता अॅप’ला मिळतोय प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:54 AM