लोकमत न्यूज नेटवर्कजालना : श्री महाराजा अग्रसेन जयंतीनिमित्त अग्रवाल महिला मंडळ, अग्रशक्ती महिला मंडळ आणि अग्रवाल बहु मंडळ यांच्या वतीने १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमास समाजातील महिला व युवतींकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याची माहिती अग्रवाल महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ. अनिता तवरावाला यांनी दिली.यानिमित्त वेगवेगळ्या टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवणे, वेगवेगळ्या झाडांच्या पानाचे तोरण तयार करणे, कागदांपासून दागदागिने तयार करणे, रांगोळी, मनोरंजनात्मक व्हिडिओ तयार करणे, दुपट्टा सजावट यासह विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस यंदा पर्यावरण संरक्षण आणि अवयवदान ही संकल्पना घेऊन स्पर्धा घेण्यात आल्या.२८ सप्टेंबर रोजी ‘तोल मोल के बोल’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यात दाखविण्यात येणाऱ्या वस्तूंची अचूक एमआरपी सांगणाºयास ती जिंकण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. अनिता तवरावाला, अग्रशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा ज्योत्स्ना पित्ती, अग्रवाल बहु मंडळाच्या अध्यक्षा नीता तवरावाला, सचिव उषा अग्रवाल, सीमा मल्लावत, वंदना देविदान, कोमल देविदान, नीता पी. अग्रवाल, सविता तवरावाला, स्मिता मित्तल, ज्योती अग्रवाल, राजेश्वरी अग्रवाल, संगीता अग्रवाल, ममता लाला, शोभा देविदान, अनिता देविदान, नीता अग्रवाल, पुष्पाबाई पित्ती, रेखा अग्रवाल, सुनंदा तंबाखूवाला, आशा बगडिया, कविता पित्ती, आरती पित्ती, सपना अग्रवाल, नम्रता पित्ती, पूजा तवरावाल, स्मिता पित्ती, रचना पित्ती, सुचिता बगडिया आदींसह इतराची उपस्थिती होती.
अग्रसेन जयंतीनिमित्त आयोजित स्पर्धेस प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:27 AM