जालना : जालना तालुक्यातील माळशेंद्रा येथे ग्रामपंचायत कार्यालय व पीर पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने बुधवारी जिल्हा परिषद शाळेत कोविड -१९ प्रतिबंधक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १८ ते ४४ वयोगटातील १५१ ग्रामस्थांनी लस टोचून घेत कोरोनामुक्त गाव मोहिमेला हातभार लावला.
माळशेंद्रा ग्रामपंचायतीने सुरुवातीपासूनच कोरोना संसर्गापासून ग्रामस्थांचे संरक्षण व्हावे याकरिता गावातील नागरिकांमध्ये प्रभावी जनजागृती, निर्जंतुकीकरण, सॅनिटायझर, मास्क वाटप व अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यावर कायम भर दिल आहे. ग्रामपंचायतीने यापूर्वी ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी आयोजित लसीकरण शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला होता. शुक्रवारी गावात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी दुसरे लसीकरण शिबिर घेण्यात आले. प्रारंभी सरपंच आनंद म्हस्के, उपसरपंच बाळासाहेब जाधव, ग्रामपंचायत सदस्य नारायण जाधव, शिवाजी काशीनाथ जाधव, रामेश्वर जाधव, शिवाजी साहेबराव जाधव, गंगाधर जाधव, माऊली जाधव, कृष्णा जाधव, राजू म्हस्के, संजय म्हस्के, बबन म्हस्के, भानुदास लहाने, कृष्णा लहाने, समाधान लहाने, पीर पिंपळगाव केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कबीर बेग, ग्रामसेवक एस.आर.पाजगे, मुख्याध्यापक श्री. बोर्डे, आरोग्य कर्मचारी एस. के. कोल्हे आदींची उपस्थितीत शिबिराला सुरुवात झाली.
शिबिरात १८ ते ४४ वयोगटातील ९५ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी पीर पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख तिडके, के. के. बोर्डे, के. टी. हारकळ, डांगे, कोल्हे, भालतडक, शिक्षक ढेंगाणे, सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.
फोटो
माळशेंद्रा जिल्हा परिषद शाळेत कोविड लसीकरण शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित सरपंच आनंद म्हस्के, उपसरपंच बाळासाहेब जाधव, ग्रामपंचायत सदस्य नारायण जाधव, शिवाजी काशीनाथ जाधव, रामेश्वर जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. कबीर बेग, मुख्याध्यापक बोर्डे आदी.