शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

परतीच्या पावसाचा जालनेकरांना तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 12:44 AM

जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा जोर कमी असला तरी गत दोन दिवसांत वीज पडल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात ५.८६ मिमी पाऊस झाला.सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जालना महसूल मंडळात १० मिमी, जालना ग्रामीण ६ मिमी, रामनगर, विरेगाव, पाचन वडगावमध्ये २ मिमी, तर सेवली ४ मिमी व वाघ्रूळ जहागीर मंडळात ६ मिमी पावसाची नोंद झाली.बदनापूर तालुक्यातील बावणे पांगरी महसूल मंडळात ४० तर दाभाडी मंडळात ६ मिमी पाऊस झाला. भोकरदन मध्ये २ मिमी, धावडा २३ मिमी, पिंपळगाव रेणुकाई ५ मिमी, हसनाबाद २ मिमी, राजूर ५ मिमी तर केदारखेडा शिवारात ७ मिमी पाऊस झाला आहे. परतूर महसूल मंडळात १५.८० मिमी पाऊस झाला. मंठा, ढोकसल ५ मिमी तर पांगरी गोसावीत ८ मिमी पाऊस झाला. अंबड २ मिमी, धनगर पिंपरी ७ मिमी, जामखेड २६ मिमी, वडीगोद्री १५ मिमी, गोंदी ७ मिमी, रोहिलागड २२ मिमी पाऊस झाला. घनसावंगीत ७ मिमी, रांजणी १५ मिमी, तीर्थपुरी, कुंभार पिंपळगाव ५ मिमी, अंतरवली टेम्बी २३ मिमी तर जांभ समर्थ येथे ५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले.१७ मंडळे कोरडीजिल्ह्यातील ३९ पैकी १७ महसूल मंडळांत पाऊस झाला नाही. यात बदनापूर तालुक्यातील बदनापूर, रोषणगाव, सेलगाव, भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार, अन्वा, जाफराबाद तालुक्यातील जाफराबाद, टेंभुर्णी, कुंभारझरी, वरूड, माहोरा, परतूर तालुक्यात सातोना, आष्टी, श्रीष्टी, वाटूर, मंठा तालुक्यातील तळणी, अंबड तालुक्यातील सुखापुरी तर घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव महसूल मंडळात पाऊस झाला नाही.रामनगर : वीज पडल्याने शाळकरी मुलाचा मृत्यूरामनगर : जालना तालुक्यातील दहिफळ (काळे) या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता दुसरीत शिकत असलेला महेश गणेश राऊत (९) दुपारी ३ वाजता शाळा सुटल्यानंतर खेळण्यासाठी बाहेर आला. शाळेच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या जुना टॉवरजवळ तो खेळत असताना अचानक वीज अंगावर पडली आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.दानापूर शिवारात लिंबाच्या झाडावर पडली वीजदानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर शिवारात मनसुबराव औचितराव पवार यांच्या वखारीवर लिंबाचे झाड आहे. या झाडावर सोमवारी दुपारी वीज पडल्याने झाड जळाले. पाऊस सुरू झाल्याने मनसुबराव पवार, चंद्रकला पवार, ज्ञानेश्वर पवार, दत्ता पवार, सोनू पवार, संदीप पवार, रामेश्वर पवार यांनी वखारीवर प्रवेश केला.तर दत्ता पवार हा पाणी पिण्यासाठी लिंबाच्या झाडा जवळील हौदावर गेला होता.तो पाणी पिऊन परत आला. त्यानंतर काही क्षणातच लिंबाच्या झाडावरती वीज पडली. वेळेवर वखारीवर गेल्याने आम्ही बचावल्याचे मनसुबराव पवार यांनी सांगितले. दरम्यान, पडसखेडा मुर्तड येथेही पावसामुळे कपाशी, मका, मिरची इ. पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकरी सुभेदार चौधरी, विश्वनाथ वरपे यांनी सांगितले. 

टॅग्स :RainपाऊसriverनदीfloodपूरDeathमृत्यू