लोकमत न्यूज नेटवर्कपारध : अल्पभूधारक व सीमांत शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी महसूल विभागाने पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत भोकरदन तालुक्यातील १५७ गावांमध्ये शिबिरे घेण्यात आली आहेत. यामुळे नावनोंदणी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी आढळून येत आहे.१८ ते ४० वयोगटातील अल्पभुधारक व सिमांत शेतक-यांनी वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर तीन हजार रूपये प्रति महिना मिळावा, यासाठी शासनातर्फे सर्वत्र प्रधानमंत्री किसान सन्मान मानधन योजना सुरू करण्यात आली आहे.ही योजना अल्पभुधारक शेतकºयांसाठी आहे. योजनेचा लाभ शेतक-यांना उतर वयात मिळणार असल्याने नाव नोंदणीसाठी गावनिहाय आपले सरकार केंद्रावर शेतक-यांची गर्दी होत आहे. ही योजना ऐच्छिक व अंशदान योजना आहे.या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला भारतीय जिवन विमाद्वारे निवृत्त वेतन दिले जाणार आहे. एक आॅगस्ट २०१९ रोजी १८ ते ४० वय असलेले अल्पभुधारक शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. त्यांना वयानुसार प्रतिमाह ५५ ते २०० रुपयाची रक्कम बँकेत जमा करावी लागणार आहे. ही रक्कम नोंदणीनंतर लाभार्थ्यांच्या खात्यातून विमा कंपनीकडे जमा होणार आहे. विशेष म्हणजे लाभार्थ्याचा अकाली मृत्यू झाला तर कुटुंबियांना निवृत्त वेतन मिळण्याची देखील तरतुद या योजनेत आहे. यामुळे माहिती मिळताच शेतकरी नाव नोंदणी केंद्रावर जावून नोंदणी करित आहेत.
महसूल विभागातर्फे १५७ गावांमध्ये शिबिरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:55 AM