लोकमत न्यूज नेटवर्कतीर्थपुरी : बोेंडअळीच्या नुकसानीचे अनुदान शासनाने जिल्हा प्रशासनाकडे जमा केले आहे. असे असतांना ते परिसरातील शेतकऱ्यांना मिळालेले नाही. हे अनुदान तातडीने वाटप व्हावे या मागणीसाठी गुरुवारी तीर्थपुरी येथे शिवसेनेच्या वतीने रास्तोरोको आंदोलन करण्यात आले.गेल्या वर्षी या परिसरात बोंडअळीने थैमान घातले होते. जोमात असलेल्या कपाशी पिकाचे मोठे नुकसान केले होते. शेतकºयांना लागवडीचा खर्चही निघाला नाही. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. महसूल प्रशासनाने बोंडअळीच्या नुकसानीचे पंचनामे सुध्दा केले होते. मात्र एक वर्ष उलटूनही परिसरातील तीर्थपुरी, खालापुरी रासमगाव, खडका आणि हिवरा या पाच गावातील शेतकºयांना गेल्या वर्षीचे बोंडअळी नुकसानीचे अनुदान अद्यापही मिळाले नाही.याबाबत शेतकºयांनी तहसील कार्यालयाकडे पाठपुरावा केला परंतु त्याचाही उपयोग झाला नसल्याचे सांगण्यात आले.शेतकºयांच्या व्यथा बघता शिवसेनेच्या वतीने बुधवारी शिवाजी चौकात तासभर रास्तारोको आंदोलन करुन रखडलेले अनुदान शेतकºयांना वाटप करण्याची मागणी केली. या आंदोलनामुळे चौकात काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. विविध मागण्यांचे निवेदन मंडळअधिकारी एम.बी. एम.बी.साळवे, गोदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल परजने यांना निवेदन देण्यात आले.यावेळी श्रीकृष्ण बोबडे संभाजी उढाण गणेश खेत्रे भिमराव वाजे श्रीमंत सोजे शेख युनूस सतीष काळे बालू तोष्णीवाल अशोक कोकाटे दिपक इंगळे विलास यशलोटे ' अर्जुन भोसले अमोल तोतला नारायण भुतेकर आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.तासभर वाहतूक ठप्पशिवसेनेच्या वतीने केलेल्या या रास्तारोको आंदोलनात परिसरातील अनेक शेतकºयांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. यामुळे तीर्थपुरी मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
बोंड अळीच्या अनुदानासाठी शिवसेनेचा रास्ता रोेको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 1:07 AM