यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
परतुरात बैठक
परतूर : ओबीसी समाज मोर्चातर्फे विविध मागण्यांसाठी २४ जानेवारी रोजी जालना शहरात मोर्चा काढला जाणार आहे. या अनुषंगाने परतूर शहरात गुरुवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत जालन्यात काढल्या जाणाऱ्या मोर्चाच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.
खेळामुळे नवचैतन्य निर्माण होते- बोराडे
मंठा : खेळामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास होऊन नवचैतन्य निर्माण होते, असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे यांनी व्यक्त केले. मंठा प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बाजार समिती संचालक बैजनाथ बोराडे, सचिन बोराडे, प्रदीप बोराडे, साजिद शेख आदींची उपस्थिती होती.
धरणातून पाणीउपसा
आन्वा : भोकरदन तालुक्यातील आन्वा व वाकडी परिसरात असलेल्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाणीउपसा केला जात आहे. याकडे वेळीच प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने अद्याप धरणात चांगला पाणीसाठा आहे.
लायन्सला भेट
जालना : लायन्स क्लब ऑफ जालनाला झोन चेअरपर्सन अरुण मित्तल, रिजन चेअरपर्सन रामकुंवर अग्रवाल यांनी नुकतीच भेट दिली. लायन्स क्लब ही जालना शहरात गेल्या काही वर्षांपासून सामाजिक कार्य करण्यात अग्रेसर आहे. यावेळी संस्थेच्या सभासदांची उपस्थिती होती.
पोलीस अधीक्षकांना मागण्यांचे निवेदन
जालना : जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश महासचिव सारिका लोकरे-अंबुरे यांच्या ११ वर्षीय मुलावर उमरगा येथे झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करीत असून, यातील दोषींवर कडक कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे.
दाभाडी गावात निधी संकलन यात्रा
दाभाडी : अयोध्येतील श्रीराम मंदिर निधी संकलनासाठी दाभाडी (ता. बदनापूर) येथे निधी संकलन रथयात्रा गुरुवारी काढण्यात आली. यासाठी श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण समितीतर्फे पुढाकार घेण्यात आला होता. टाळमृदंगाच्या गजरात ही रथयात्रा काढण्यात आली. यावेळी नागरिकांची मोठी उपस्थिती होती.