लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील बहुतांश एटीएममध्ये सोमवारी नोटांचा खडखडाट होता. ऐन दिवाळीच्या तोंडावर एटीएममध्ये कॅश नसल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहेदिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वचजण खरेदी करतांना दिसत आहे. शहरातील बाजारपेठेतही मोठी गर्दी आहे. परंतु, सोमवारी शहरातील एटीएममध्ये खडखडाट असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. शहरातील ४० टक्के एटीएम बंद होते. शहरातील भोकरदन नाका, बडीसडक, शिवाजी पुतळ, रेल्वेस्थानक परिसरात असलेल्या काही एटीएममध्ये कॅश नव्हती. एटीएम बंद राहिल्याने बँक खातेदारांनी संताप व्यक्त केला.
दिवाळीच्या तोंडावर एटीएममध्ये खडखडाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 12:21 AM