यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी.आर. गायकवाड होते. यावेळी प्रा. सुखदेव मांटे, उपप्राचार्य रमेश भुतेकर, गोविंद गोंडे आदींची उपस्थिती होती.
आ. विक्रम काळे पुढे म्हणाले, पेन्शन योजनेचा संभ्रम दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असून, शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तयार आहे. कोरोना काळात संकटे आल्याने दोन पिढींचे शैक्षणिक नुकसान झाले, ते भरून निघावे, शिक्षण विभागातील शिक्षकांची कामे तत्परतेने व्हावीत, अंशदान योजनेचा शासन हिस्सा प्राप्त झाला असून, वेतन पाच तारखेपूर्वी व्हावे, यासाठी प्रयत्न राहतील. काही शाळांच्या २०-४० टक्के अनुदानाच्या पुरवणी मागणी येत्या अधिवेशनात विविध प्रस्तावांबाबत त्रुटी पूर्ततेसाठी अधिकारी स्थानिक ठिकाणी येणार, तसेच शाळांनी रोस्टर, पटसंख्येबाबत त्रुटी पूर्ण करून पाठपुरावा करावा. त्यांच्या अनुदान वेतनासह होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवाय निवड वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी ऑनलाइन प्रशिक्षण लवकरच होणार असून, कोरोना आजारपण उपचारासाठी वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी प्रयत्न केले. राज्यातील कायम शब्द काढलेल्या सर्व शाळा तुकड्यांच्या वेतन अनुदानासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही यावेळी दिली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. बी.आर. गायकवाड म्हणाले, शिक्षकांचे विविध प्रश्न शिक्षक आमदारांनी सोडवावेत. त्या शिक्षकांनी सामुदायिक समन्वय ठेवायला हवा. विखुरलेले प्रश्न गांभीर्याने मांडले पाहिजेत. सर्व शिक्षकांचे प्रश्न सोडवणे गरजेचे असून, सगळे प्रश्न सनदशीर मार्गाने सोडवावेत. शिक्षकांचे प्रश्न आमदारांनी प्राधान्न्याने सोडवावेत, असे आवाहन डॉ. गायकवाड यांनी केले. यावेळी
जिल्हा राष्ट्रवादी शिक्षक संघ शिक्षक संवाद कार्यक्रमात शिक्षक प्रश्नावर कार्य करणारे शिक्षक, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
चौकट
यावेळी अनेक शिक्षकांनी आपले प्रश्न पोटतिडकीने मांडले, शिक्षक समस्या सोडवाव्यात, पेन्शन प्रश्न, अनुदान टप्पे, १०० टक्के अनुदान, तुकडी मान्यता, संच मान्यता नियमावली डीसीपीएस कनिष्ठ शालार्थ आयडी प्रलंबित आदी प्रश्नांबाबत शिक्षकांमध्ये असंतोष दिसून आला.