सुखापुरी : अंबड तालुक्यातील सुखापुरी महसूल मंडळात यावर्षी सर्वात कमी २६० मि.मी. पाऊस पडला आहे. यामुळे सुखापुरी परिसरातील सर्वच लहान मोठे जलस्त्रोत सध्या स्थितीत आटले असल्याने जनावरांच्या चाऱ्या- पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे.यंदा चांगला पाऊस पडेलं. विहिर, बोअरला पाणी राहील या आशेवर शेतकºयांनी बँकेकडून पीक कर्ज काढले होते. तसेच स्वत:कडील पदरमोड करून सोने बँकेत गहाण टाकून मोठ्या आशेने खरिप व रब्बी पिकांची पेरणी केली होती. मात्र, पावसाने हुलकावणी दिल्याने खरिप व रब्बी पिके वाया गेल्याने शेतकरी कर्जबाजारी बनला आहे.सुखापुरी महसूल मंडळातील सुखापुरी, लखमापुरी, बेलगाव, कुक्कडगाव, रेवलगाव, शहापूर, दाढेगाव, पि. सिरजगाव, वडीकाळ्या, रुई, भारडी या गावात सुरुवातीला पाऊस चांगला झाल्याने शेतकºयांनी मोठ्या उत्साहात ऊस, मोसंबी, पेरू, सीताफळ, डाळिंब, आंबा या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती. या पिकांवर एकरी साधारणपणे २५ ते ३० हजार रूपयांपर्यंत खर्च केला. मात्र, पाऊसच न पडल्याने सर्वच पिके करपून गेली आहेत.बोअरला फुफाटाच : हजारो रूपयांचा चुराडा४सध्या स्थितीत सुखापुरीसह परिसरातील तलाव, बोअर, विहिरी, कूपनलिका आटल्याने पिकांना शेतकºयांना पाणी देता येत नाही. शेतात नवीन बोअर तीनशे फुटांपर्यंत खोदून देखील केवळ फुफाटाच उडत आहे. बोअरला पाणी लागेल या आशेनं अनेक शेतकरी हजारो रूपये खर्च करित आहेत. मात्र, बोअरला पाणी लागत नसल्याने पिकांसह फळबागा करपून चालल्या आहेत.
सुखापुरी गावाला संजीवनी देणारा तलाव कोरडाठाक...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:22 AM
अंबड तालुक्यातील सुखापुरी महसूल मंडळात यावर्षी सर्वात कमी २६० मि.मी. पाऊस पडला आहे. यामुळे सुखापुरी परिसरातील सर्वच लहान मोठे जलस्त्रोत सध्या स्थितीत आटले असल्याने जनावरांच्या चाऱ्या- पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे.
ठळक मुद्देपाण्यासाठी भटकंती : विहिरी, बोअर व कूपनलिका आटले