जालना : गोदावरी नदीसह जिल्ह्यातील इतर नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन, वाहतूक करणाऱ्यांविरूध्द महसूल, पोलीस पथकाने १४४ धाडी मारल्या आहेत. या कारवाईनंतर संबंधित वाळू तस्करांवर तब्बल ३ कोटी २३ लाख ५१ हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला होता. मात्र यापैकी केवळ ५८ लाख ७५ हजाराचा दंड काही वाळू तस्करांनी महसूलकडे जमा केला आहे.जालना जिल्ह्यातून वाहणाºया गोदावरी नदीसह इतर नद्यांच्या पात्रातून अवैध वाळू उत्खनन, वाहतूक करणाºया तस्करांच्या टोळ्याच जिल्ह्यात कार्यरत आहेत. अशा वाळू तस्करांना लगाम लावण्यासाठी महसूल यंत्रणेसह पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी सातत्याने कारवाई मोहीम राबवित आहेत. चालू वर्षात जिल्हाभरात एकूण १४४ कारवाया करण्यात आल्या आहेत. यात संबंधित वाळू तस्करांवर ३ कोटी २३ लाख ५१ हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला होता. वाळू तस्करांनी ५८ लाख ७५ हजार रूपयांचा दंड महसूल यंत्रणेकडे भरला आहे.यात जालना तालुक्यात २ कारवाया करून २ लाख ६२ हजाराचा दंड आकारण्यात आला होता. पैकी २ लाख ६१ हजार रूपयांचा दंड वसूल झाला आहे. बदनापूर तालुक्यात ७ कारवाया करण्यात आल्या होत्या. संबंधितांवर २ लाख ८८ हजाराचा दंड आकारण्यात आला होता. हा सर्वच दंड वसूल झाला आहे.भोकरदन तालुक्यात १६ कारवाया करून वाळू तस्करांना ३५ लाख ९७ हजाराचा दंड करण्यात आला होता. पैकी ७ लाख २७ हजार रूपयांचा दंड वसूल झाला आहे. जाफराबाद तालुक्यात ८ कारवाया झाल्या होत्या. यात १४ लाख ४० हजाराचा दंड आकारण्यात आला होता. मात्र यातील केवळ ७ लाख २० हजार रूपयांचा दंड वसूल झाला. परतूर तालुक्यात १० झाल्या. यात ३३ लाख ६३ हजाराचा दंड झाला होता. मात्र, वाळू तस्करांनी दंडातील छदामही भरलेला नाही.मंठा तालुक्यात १८ कारवाया करून २३ लाख ४३ हजाराचा दंड आकारण्यात आला होता. पैकी १५ लाख ११ हजार रूपयांचा दंड वसूल झाला आहे. अंबड तालुक्यात जिल्ह्यात सार्वाधिक ७० कारवाया झाल्या होत्या. या प्रकरणातील वाळू तस्करांना तब्बल १ कोटी ९५ लाख ८६ हजाराचा दंड आकारण्यात आला होता.या वाळू तस्करांनी आजवर केवळ १४ लाख ९३ हजार रूपयांचा दंड भरला आहे. तर घनसावंगी तालुक्यात १३ कारवाया करण्यात आल्या होत्या. वाळू तस्करांना १४ लाख ७३ हजाराचा दंड आकारण्यात आला होता. मात्र वाळू तस्करांनी ८ लाख ७५ हजार रूपयांचा दंड भरला आहे.धडक कारवाई : ४९ प्रकरणात गुन्हे४वाळू तस्करी करणाºया १४४ जणांविरूध्द जिल्ह्यात कारवाया करण्यात आल्या होत्या. सर्वाधिक नियमांचे उल्लंघन करून दंड न भरल्याने ४९ प्रकरणात पोलीस विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महसूल बरोबर पोलीस प्रशासनही वाळू तस्करांविरूध्द धडक कारवाई करीत आहे.
वाळू तस्करांना ३ कोटी रुपयांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 12:13 AM
जालना : गोदावरी नदीसह जिल्ह्यातील इतर नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन, वाहतूक करणाऱ्यांविरूध्द महसूल, पोलीस पथकाने १४४ धाडी मारल्या आहेत. ...
ठळक मुद्दे१४४ प्रकरणे : वसुली मात्र केवळ ५८ लाख रुपयांची