लोकमत न्यूज नेटवर्कहसनाबाद : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महसूल, पोलीस प्रशासन कारवाई करीत आहे. मात्र, हसनाबाद व परिसरातील अनेकांनी चक्क बैलगाडीतून वाळूची वाहतूक करण्याचा पर्याय शोधला आहे. ३० ते ४० टोपले वाळू असलेल्या बैलगाडीची एक खेप ८० ते १५० रुपयांपर्यंत केली जात आहे.हसनाबाद परिसरातील गिरीजा नदीपात्रातून गत दोन वर्षापासून वाळूची अवैध वाहतूक होत होती. मात्र, प्रशासनाने थेट कारवाईचे सत्र हाती घेतल्याने जेसीबी, टिप्पर, ट्रक, ट्रॅक्टर इ. वाहनांद्वारे वाळू वाहतूक करण्याला मोठा लगाम लागला आहे. हसनाबाद, खडकी, बोरगाव, सिरसगाव, जानेफळ, लतीफपूर, टाकळी येथून वाहणाºया गिरीजा नदीपात्र खडकापर्यंत खोदून बुलडाणा, जालना, औरंगाबाद, सिल्लोड, जाफराबाद, फुलंब्री, बदनापूर आदी भागात अवैध वाळू वाहतूक होत होती. मात्र, कारवाईमुळे वाळू तस्करी थांबली असून, अनेकांची बांधकामेही रखडली आहेत. वाळू वाहतुकीला पर्याय म्हणून अनेकांनी बैलगाडीला पसंती दिली. बैलगाडीत ३०- ४० टोपले वाळू भरून वाहतूक केली जात आहे. त्यामुळे अनेकांची बांधकामे सुरू झाली आहेत.
बैलगाडीतून होतेय वाळूची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 1:30 AM