लोकमत न्यूज नेटवर्क
जालना - ‘स्वच्छ भारत अभियान २०२१’ अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’ अभियानांतर्गत तालुक्यातील माळशेंद्रा येथे शुक्रवारी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात महिला, पुरुष व तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी होत गाव परिसर स्वच्छ केला.
ग्रामपंचायत कार्यालयासमोर सकाळी आठ वाजता सरपंच आनंद म्हस्के, उपसरपंच बालू जाधव, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी काशीनाथ जाधव, भागूबाई जाधव, शिवाजी जाधव, नारायण जाधव, गंगाधर जाधव, रामेश्वर जाधव, कृष्णा जाधव, ग्रामसेवक एस. आर. पाजगे यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. यावेळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाचा संपूर्ण परिसर स्वच्छ केला. परिसरातील गवत काढून कचऱ्याची विल्हेवाट लावली तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मारुती मंदिर परिसरातील संपूर्ण कचरा झाडून साफ केला. कचरा एकत्र करून तो कुंडीत नेऊन टाकला. गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात ग्रामस्थांनी स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला. तसेच गावातील मुख्य रस्त्यांवरील कचरा संकलित करून रस्ते स्वच्छ केले. गावात राबविण्यात आलेल्या या विशेष स्वच्छता मोहिमेमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या स्वच्छता मोहिमेत राजू म्हस्के, संतोष जाधव, वसंता जाधव, हरी म्हस्के, प्रभू म्हस्के, मनोहर जाधव, सदाशिव जाधव, एकनाथ जाधव, नवनाथ जाधव, विष्णू म्हस्के, सोमीनाथ म्हस्के, बळीराम जाधव, अविनाश जाधव, अनंता जाधव, आसाराम जाधव, रमेश वराडे, सुरेश काटकर, भिका डिगे, सदाशिव लहाने यांच्यासह ग्रामस्थांनी सहभाग घेतला.